• Download App
    पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने वर्तवला भारत-पाकिस्तान सामन्याचा त्याचा अंदाजFormer Pakistan Captain Rashid Latif gave his verdict on the match between India Pakistan in T20 World Cup.

    पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने वर्तवला भारत-पाकिस्तान सामन्याचा त्याचा अंदाज

    कोरोनामुळे लांबलेल्या टी ट्वेन्टी वर्ल्ड कपमधील सर्वाधिक चर्चेचा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रविवारी दुबईत खेळला जात आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार रशिद लतीफने या सामन्याबद्दलचा त्याचा अंदाज व्यक्त केला आहे. Former Pakistan Captain Rashid Latif gave his verdict on the match between India Pakistan in T20 World Cup.


    वृत्तसंस्था

    दुबई :  भारताने चुकांचा पाऊस पाडला तरच पाकिस्तानला रविवारच्या टी-ट्वेन्टी वर्ल्ड कपमधील सामना जिंकता येईल, अशा स्पष्ट शब्दात पाकिस्तानचा माजी कर्णधार रशिद लतिफने त्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

    खलिज टाईम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये लतीफने एक प्रकारे पाकिस्तान जिंकू शकणार नसल्याचीच कबुली दिली आहे. माझ्या मते पाकिस्तान किती चांगला खेळतो याला फार महत्त्व नाही. भारतीय खेळाडूंनी काही चुका केल्याच नाहीत तर पाकिस्तानला सामना जिंकणे मुश्कील आहे, असे लतीफ म्हणाला.

    “मी जेव्हा पाकिस्तानचा कर्णधार होतो तेव्हा प्रतिस्पर्धी संघाने चुका कराव्यात यासाठी मी सातत्याने प्रयत्न करायचो. अर्थात तुम्हाला तुमचे काम आधी करावे लागतेच. पण त्याचवेळी समोरच्या संघालाही चुका करण्यास भाग पाडावे लागते. त्यामुळे सामना फक्त तंत्र आणि कौशल्यांचा नसतो. प्रतिस्पर्ध्यांना चुका करायला लावणारी रणनिती महत्त्वाची असते,” असे लतीफ म्हणाला.

    बावन्न वर्षाच्या लतीफने सांगितले की विराट कोहलीला चुका करण्यास भाग पाडता येऊ शकते. टॉस जिंकल्यानंतर विराट काय करतो आणि त्याची संघनिवड काय असेल हे पाहणे महत्त्वाचे आहे, असे लतीफने सांगितले. “तो सूर्यकुमार यादव याला खेळवणार की ईशान किशनला? त्यांचे फिरकी गोलंदाज कोण हेही पाहावे लागेल. आर. अश्विन, रविंद्र जडेजा आणि वरुण चक्रवर्ती असे पर्याय विराटपुढे आहेत. गोलंदाजी आणि फलंदाजीत पुष्कळ पर्याय असल्याने अंतिम अकरांची निवड करताना विराट चुकण्याची शक्यता आहे,” असेही लतीफने सांगितले.

    पाकिस्तानने आजवर एकाही वर्ल्ड कप मध्ये भारताला हरवलेले नाही. वर्ल्ड कपमध्ये बाराच्या बारा सामन्यांमध्ये भारताने पाकिस्तानवर मात केली आहे. यातले पाच पराभव टी-ट्वेन्टी वर्ल्ड कपमधले आहेत. विशेष म्हणजे यात भारताने जिंकलेल्या पहिल्या टी-ट्वेन्टी वर्ल्ड कपमधील अंतिम सामन्याचाही समावेश आहे.

    Former Pakistan Captain Rashid Latif gave his verdict on the match between India Pakistan in T20 World Cup.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Shahbaz : PAK पंतप्रधानाचा खोटारडेपणा; शाहबाज म्हणाले- भारताकडून आधी युद्धबंदीचे उल्लंघन; रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढणार

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    American Pope : नवीन पोपची घोषणा झाली, रॉबर्ट प्रीव्होस्ट सर्वात मोठे ख्रिश्चन धर्मगुरू, पहिले अमेरिकी पोप