fumio kishida elected japans new prime minister : जपानच्या संसदेने सोमवारी माजी परराष्ट्र मंत्री फुमियो किशिदा यांची देशाचे नवे पंतप्रधान म्हणून निवड केली. योशिहिदे सुगा यांच्यानंतर किशिदा जपानचे 100 वे पंतप्रधान असतील. सुगा आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने आदल्या दिवशी राजीनामा दिला. किशिदा आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचे सदस्य लवकरच शपथ घेतील. former foreign minister fumio kishida elected japans new prime minister
वृत्तसंस्था
टोकियो : जपानच्या संसदेने सोमवारी माजी परराष्ट्र मंत्री फुमियो किशिदा यांची देशाचे नवे पंतप्रधान म्हणून निवड केली. योशिहिदे सुगा यांच्यानंतर किशिदा जपानचे 100 वे पंतप्रधान असतील. सुगा आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने आदल्या दिवशी राजीनामा दिला. किशिदा आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचे सदस्य लवकरच शपथ घेतील.
विशेष म्हणजे गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये पदभार स्वीकारल्यानंतर केवळ एक वर्षानेच सुगा यांना पद सोडावे लागले. एक वर्षापूर्वी तत्कालीन पंतप्रधान शिंजो आबे यांनी आजारपणामुळे पायउतार होण्याचा निर्णय घेतला तेव्हा सुगा यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली होती. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि संसर्ग असूनही ऑलिम्पिक खेळ आयोजनावर ठाम राहिल्यामुळे सुगा यांची लोकप्रियता कमी झाली आणि केवळ एका वर्षाच्या कार्यकाळानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला.
किशिदांसमोर अनेक आव्हाने
किशिदा यांच्यासमोर येणाऱ्या राष्ट्रीय निवडणुकीपूर्वी जागतिक कोरोना महामारी आणि सुरक्षेच्या आव्हानांना सामोरे जाण्याचे आव्हान आहे. किशिदा यांनी गत आठवड्यात म्हटले की, त्यांचे सर्वोच्च प्राधान्य अर्थव्यवस्थेला असेल. जपानचे माजी परराष्ट्र मंत्री किशिदा यांनी गेल्या आठवड्यात सत्ताधारी पक्ष लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीच्या नेत्याच्या पदासाठी निवडणूक जिंकली होती. सोमवारी सकाळी मतदानापूर्वी किशिदा यांनी सांगितले की, ते सर्वोच्च पदासाठी तयार आहेत. ते म्हणाले, “मला वाटते की खऱ्या अर्थाने ही एक नवीन सुरुवात असेल आणि मला भविष्यातील आव्हानांना प्रबळ इच्छाशक्ती आणि दृढनिश्चयाने सामोरे जायचे आहे.”
former foreign minister fumio kishida elected japans new prime minister
महत्त्वाच्या बातम्या
- निवडणूक हिंसाचारातील पीडितांना नुकसान भरपाई न दिल्याबद्दल हायकोर्टाने ममता सरकारला फटकारले
- लखीमपूर हिंसा : सर्व मृतांच्या नातेवाइकांना 45 लाखांची मदत, कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी, जिल्ह्यात राजकीय नेत्यांच्या प्रवेशावर बंदी
- लखीमपूर हिंसाचार : ‘प्रियांका, मला माहिती आहे मागे हटणार नाहीस!’, पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर राहुल गांधींचे ट्वीट
- वाचा सविस्तर… लखीमपूर हिंसाचाराचा आरोप असलेला केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांचा मुलगा कोण? फॅमिली बिझनेस सांभाळतो, राजकारणात सक्रिय;
- लखीमपूर दुर्घटना : केंद्रीय मंत्र्यांचा मुलासह 14 जणांविरोधात गुन्हा दाखल, 4 शेतकऱ्यांसह 8 जणांचा झाला होता मृत्यू