विशेष प्रतिनिधी
काबूल : देशात तालीबान्यांकडून होणारा रक्तपात टाळण्यासाठी आपण देश सोडला असल्याची कबुली अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून दिली आहे. अशरफ घनी यांनी कोठे गेल्याचे मात्र सांगितले नाही. Former Afghan President Ashraf Ghani left the country to avoid bloodshed, confessed in a post on Facebook
आपल्या पोस्टमध्ये अश्रफ घनी म्हणाले आज मला एक कठीण निर्णय घेण्याची वेळ आली आहे. मी सशस्त्र तालिबान्यांना सामोरे जायला हवे जे राजवाड्यात प्रवेश करू इच्छितात किंवा प्रिय देश (अफगाणिस्तान) सोडून जावे ज्याचे संरक्षण करण्यासाठी माझे आयुष्य समर्पित केल. मात्र, मी देश सोडण्याचा पर्याय स्वीकारला. कारण जर मी देश सोडला नाही तर सुमारे ६० लाख लोकसंख्येच्या या शहरावर मोठी आपत्ती आली असती. प्रचंड रक्तपात झाला असता. असंख्य देशवासी शहीद झाले असते. काबूल शहराचा नाश झाला असता. तालिबान्यांनी मला सत्तेवर पदच्युत करण्यासाठी हे केले आहे. तालिबानने तलवार आणि बंदुकीच्या जोरावर हा विजय मिळविला आहे. मात्र आता अफगाणिस्तानच्या लोकांचे संरक्षण करणे हे त्यांचे कर्तव्य आहे.
दरम्यान तालीबानी काबूलमध्ये शिरले असून सर्व बॉर्डर क्रासिंगवर ताबा मिळवला आहे.आता तालिबानने ट्रांझिशन फेजची (सत्ता परिवर्तन) मागणी केली आहे. यावर अफगाणिस्तानचे कार्यवाहक गृहमंत्री अब्दुल सत्तार मिर्झाकवाल यांनीही मान्यता दिली आहे. अफगाणिस्तानचे कार्यवाहक गृहमंत्री अब्दुल सत्तार मिर्झाकवाल म्हणाले,काबूलवर हल्ला होणार नाही, सत्ता परिवर्तन शांततेत होईल.काबुलच्या सुरक्षेची जबाबदारी सुरक्षा दलांची आहे.
तालिबानकडून वाटाघाटी करणारे काही लोक अफगाणिस्तानच्या राष्ट्रपती भवनात जात आहेत. ते सत्ता हस्तांतरणासंदर्भात चर्चा करतील.तत्पूर्वी, तालिबानने निवेदन जारी केले होते, की काबुलवर ताकदीच्या जोरावर ताबा मिळविण्याची तालिबानची इच्छा नाही. आम्हाला सर्व काही ट्रांझिशन फेजने हवे आहे. सत्ता परिवर्तन सहजतेने झाले, तर कुठल्याही प्रकारची जीवित वा वित्तहानी होणार नाही.सैनिकांवर कारवाई करणार नाही. एवढेच नाही, तर नागरिक अथवा अफगाण सैन्यावर बदला घेण्याच्या भावनेतून कसल्याही प्रकारची कारवाई करणार नाही.
सर्वांना घरातच राहण्याचीही धमकी देण्यात आली आहे. तसेच कुणीही देश सोडण्याचाही प्रयत्न करू नये, असेही तालीबानने म्हटले आहे.
Former Afghan President Ashraf Ghani left the country to avoid bloodshed, confessed in a post on Facebook
महत्त्वाच्या बातम्या
- WATCH : लेबनॉनमध्ये इंधनाच्या टँकरचा भीषण विस्फोट, 28 जणांचा मृत्यू, संतप्त जमावाने टँकर मालकाचे घरही जाळले
- रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी दिल्या स्वातंत्र्यदिनाचे शुभेच्छा, म्हणाले- आंतरराष्ट्रीय प्रश्न सोडवण्यात भारताची महत्त्वपूर्ण भूमिका
- Lockdown In Maharashtra : ‘तर महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन’, स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला थेट इशारा