पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी आणला आहे एक नवीन कायदा; देशात कार्यरत असलेल्या कंपन्याही या कायद्याच्या कक्षेत येणार आहेत.
विशेष प्रतिनिधी
रोम : इटालियन सरकार लवकरच इंग्रजी आणि इतर परदेशी भाषांवर बंदी घालणार आहे. याअंतर्गत नागरिकांकडून असे केल्यास मोठा दंड देखील आकारण्यात येणार आहे. इटालियन पक्षाच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी एक नवीन कायदा आणला आहे, ज्यामुळे अधिकृत संभाषणात कोणतीही परदेशी भाषा, विशेषतः इंग्रजी बोलल्यास 100,000 युरो (सुमारे 89 लाख रुपये) पर्यंत दंड होऊ शकतो. Formal English conversation will be banned in Italy! Violation of the rules will result in heavy fines
सीएनएनने वृत्त दिले आहे की, इटालयीन आपल्या अधिकृत संभाषणादरम्यान जर इंग्रजी किंवा अन्य परदेशी भाषेचा उपयोग करत असतील, तर त्यांना पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या ब्रदर्स ऑफ इटली पार्टीद्वारे सादर करण्यात आलेल्या नव्या कायद्यानुसार 100,000 युरो (USD 108,705) पर्यंत दंड आकारला जाऊ शकतो.
फॅबिओ रॅम्पेली यांनी कायद्याचे समर्थन केले
इटालियन चेंबर ऑफ डेप्युटीजमध्ये (खालच्या सभागृहात), नेत्या फॅबियो रॅम्पेली यांनी पंतप्रधानांनी समर्थित कायदा सादर केला. इटालियन सरकारने सादर केलेला हा कायदा परदेशी भाषेबद्दल आहे. परंतु विशेषतः “अँग्लोमॅनिया” किंवा इंग्रजी शब्दांच्या वापरावर आधारित आहे. जॉर्जिया सरकारच्या मते, इंग्रजी किंवा परदेशी भाषा इटालियन भाषेची “निंदा आणि अपमान” करते.
मात्र, या विधेयकावर अद्याप संसदेत चर्चा व्हायची आहे. हा कायदा अधिकृत कागदपत्रांमध्येही इंग्रजी वापरण्यास बंदी घालतो. देशात कार्यरत असलेल्या कंपन्याही या कायद्याच्या कक्षेत येतील. या मसुद्याच्या कायद्यानुसार, परदेशी संस्थांचे सर्व अंतर्गत नियम आणि रोजगार करार इटालियन भाषेत असणे आवश्यक आहे. मसुद्यात असे म्हटले आहे की ते केवळ फॅशनसाठी नाही. असे करण्यात अयशस्वी झाल्यास 5,000 ते 100,000 यरोच्या दरम्यान दंड होऊ शकतो.
Formal English conversation will be banned in Italy Violation of the rules will result in heavy fines
महत्वाच्या बातम्या
- बिहारमध्ये हिंसाचार सुरूच; सासाराममध्ये बॉम्बस्फोट तर गोळीबाराच्या आवाजाने नालंदामध्ये दहशत, संचारबंदीही लागू!
- धक्कादायक : ‘एलिझा’ चॅटबॉटसोबत सहा आठवडे बोलल्यानंतर बेल्जियममधील व्यक्तीची अखेर आत्महत्या!
- राहुल गांधींच्या अडचणीत वाढ! आणखी एक मानहानीचा खटला हरिद्वार न्यायालयात दाखल
- नाशिकमधील वेदोक्त प्रकरण; संयोगिता राजेंच्या भूमिकेला संभाजीराजेंचा पाठिंबा