वृत्तसंस्था
लंडन : ब्रिटनमधून परदेशी कामगार देश सोडून जात आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दुसरीकदे ब्रिटनची अर्थव्यवस्था कोरोनाच्या संकटातून बाहेर येईल का ? असा प्रश्न आहे.Foreign workers beat Britain; 7 lakh people migrated from London during the year
ब्रिटनमध्ये लॉकडाऊनच्या काळात रेस्टॉरन्ट आणि बारमधील कामगारांनी रोजगार गमावला तसेच ब्रेक्झिट आणि त्यानंतरच्या कोरोनमुळे ब्रिटनमध्ये स्थलांतरीत कामगारांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे त्यांनी देश सोडला आहे.
गेल्या दोन वर्षापासूनची ब्रेक्झिटची प्रक्रिया सुरू आहे. त्याने अर्थव्यवस्थेसमोर काही अवघड प्रश्न उभे होते. त्या प्रश्नांतून वाट काढतानाच कोरोनाचे संकट आले. यामुळे ब्रिटनमध्ये सुरुवातीला मोठा लॉकडाऊन लावावा लागला. त्याचा फटका अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात बसला आहे.
केवळ लंडन शहरातून गेल्या वर्षभरात सात लाख कामगारांनी बाहेर स्थलांतर केल आहे. याचा फटका प्रामुख्याने शहराच्या अर्थव्यवस्थेला आणि शहरातील उद्योगांना बसला आहे. काम सोडून गेलेले कामगार हे परत कामावर येत नाहीत.
त्यामुळे उद्योगांसमोर कौशल्य असलेल्या कामगारांचा तुटवडा आहे. त्यामुळे उद्योगांना फटका बसला असून देशाचा कर-महसूलही कमी झाला असल्याचं किंग्ज कॉलेज लंडन इकॉनॉमिक्सचे प्राध्यापक जोनाथन पोर्टेस यांनी सांगितलं.
परदेशी कामगार सोडून जाण्याचा फटका हा हॉस्पिटॅलिटी आणि रिटेल क्षेत्राला मोठा बसला आहे. या क्षेत्राला अनुक्रमे 30 टक्के आणि 18 टक्के कामगार सोडून गेले आहेत. कोरोनामुळे सरकारच्या माहिती गोळा करण्यावर काही बंधनं आल्यामुळे नेमके किती कामगार देश सोडून गेले आहेत याचा अंदाज येत नाही. पण लेबर फॉरेन सर्व्हेनुसार, नऊ लाख ते 83 लाख कामगारानी देश सोडल्याचा अंदाज व्यक्त आहे.
Foreign workers beat Britain; 7 lakh people migrated from London during the year