विशेष प्रतिनिधी
उत्तर कोरिया : 2020 मध्ये सुरू झालेल्या कोरोनाच्या महामारीमुळे उत्तर कोरियाने चीन सोबतची बॉर्डर बंद केली होती. यामुळे ची उत्तर कोरियाच्या अर्थव्यवस्थेमध्ये मात्र प्रचंड मोठे बदल झाले हाेते. पुरवठ्याच्या कमतरतेमुळे आणि वाढत्या मागणीमुळे दैनंदिन वस्तूंच्या किमती देखील गगनाला भिडल्या होत्या. नाव न सांगण्याच्या अटीवर सरकारी मार्गदर्शना बद्दल बोलताना उत्तर कोरियातील एक नागरिक म्हणाले, येथील लोकांना अशी चेतावणी देण्यात आली आहे की 2025 पूर्वी चीनची सीमा काही उघडण्याची शक्यता नाही. तोवर तुम्ही कमी जेवण करा.
Food shortage in North Korea! Take less meals by 2025, says dictator Kim Jong Un
उत्तर कोरियामधील केंद्रीय समितीने लोकांना अन्नाची कमतरता असल्यामुळे स्वत: पीक निर्मिती करण्याचे निर्देश दिले आहेत. पण सर्वांना हे शक्य नसल्यामुळे तिथली परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. अन्नधान्यासाठी अतिशय चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली असताना उत्तर कोरियाच्या लोकांना सध्या अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आणि किम जोंग उन यांनी स्वावलंबनाचा ऐनवेळी विचार केल्यामुळे परिस्थिती अजूनच बिकट झाली आहे.
अमेरिकेचा दक्षिण कोरियाबरोबर युद्धसराव; उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोग यांची बहिण संतापली
यूएच्या अंदाजानुसार, उत्तर कोरियामध्ये यावर्षी सुमारे 860000 टन अन्नाची कमतरता निर्माण झाली आहे. उत्तर कोरिया गव्हर्मेंटने अन्नाच्या कमतरतेसाठी बाह्य गोष्टींना जबाबदार धरले आहे. लादलेले निर्बंध, नैसर्गिक आपत्ती आणि जागतिक कोरोना व्हायरस ह्या साथीच्या रोगाला देशातील अन्न धान्याच्या कमतरतेसाठी जबाबदार धरले आहे.
Food shortage in North Korea! Take less meals by 2025, says dictator Kim Jong Un
महत्त्वाच्या बातम्या
- NCRB Report : शेतकरी आत्महत्यांमध्ये 2020 मध्ये १८ % वाढ, महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या
- नवाब मलिकांच्या आरोपांवर एनसीबीचेही प्रत्युत्तर, एखाद्याविरुद्ध कारवाई करायला सांगणारे तुम्ही कोण?
- देवेंद्र फडणवीसांचा नवाब मलिकांना टोला ; म्हणाले – राष्ट्रवादीचा पोपट रोज बोलत आहे ना?
- ‘फेसबुक’चे नाव बदलल्याने युजर्ससाठी नेमकं काय-काय बदलणार? मार्क झुकेरबर्गने काय सांगितले! वाचा सविस्तर…