Mehul Choksi : भारताचा फरार हिरे व्यापारी मेहुल चोकसी हा सध्या डोमिनिका पोलिसांच्या कोठडीत आहे. चोकसीवर अँटिग्वा सोडून पळून गेल्याचा आरोप आहे. डोमिनिकाच्या तुरुंगात कैद असलेल्या फरार हिरे व्यापारी मेहुल चोकसीची छायाचित्रे समोर आली आहेत. हे फोटो तेथील माध्यमांनी प्रसिद्ध केले आहेत. या फोटोंमध्ये मेहुल चोकसीला झालेल्या मारहाणीच्या खुणा दिसत आहेत. चित्रात दिसलेला मेहुल चोकसी हा तुरुंगातील कारागृहाच्या मागील बाजूस आहे आणि त्याच्या हातावर जखमांचे व्रण दिसत आहेत. first photo of fugitive diamantaire mehul choksi in police custody in dominica
विशेष प्रतिनिधी
डोमिनिका : भारताचा फरार हिरे व्यापारी मेहुल चोकसी हा सध्या डोमिनिका पोलिसांच्या कोठडीत आहे. चोकसीवर अँटिग्वा सोडून पळून गेल्याचा आरोप आहे. डोमिनिकाच्या तुरुंगात कैद असलेल्या फरार हिरे व्यापारी मेहुल चोकसीची छायाचित्रे समोर आली आहेत. हे फोटो तेथील माध्यमांनी प्रसिद्ध केले आहेत. या फोटोंमध्ये मेहुल चोकसीला झालेल्या मारहाणीच्या खुणा दिसत आहेत. चित्रात दिसलेला मेहुल चोकसी हा तुरुंगातील कारागृहाच्या मागील बाजूस आहे आणि त्याच्या हातावर जखमांचे व्रण दिसत आहेत.
मेहुल चोकसी डोमिनिकामधील गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) च्या ताब्यात आहे. चार दिवसांपूर्वी त्याला अटक करण्यात आली होती. मेहुलने दाखवलेल्या चित्रांमध्ये तो तुरुंगात दिसला आहे. त्याच्या हाताला दुखापत झाल्याचे चित्रांमध्ये दिसत आहे. त्याचे डोळे तांबडे आहेत आणि तो शरीराने खूप कमकुवत दिसत आहे. मेहुल चोकसीच्या वतीने असा आरोप केला जात आहे की, त्याला डोमिनिकाच्या तुरुंगात मारहाण करण्यात आली.
दरम्यान, कतार एक्झिक्युटिव्ह बॉम्बार्डियर ग्लोबल 5000 विमान डोमिनिका येथे पोहोचण्यावर अंदाज बांधले जात आहेत.हे विमान डोमिनिकाच्या डग्लस चार्ल्स विमानतळावर उतरले आहे. अँटिग्वाच्या माध्यमांत, हे विमान डोमिनिकामध्ये कुणासाठी आले आहे? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. नुकतेच अँटिग्वा येथून पळून गेलेला हिरे व्यापारी मेहुल चोकसी शेजारच्या डोमिनिकामध्ये पकडला गेला होता.
first photo of fugitive diamantaire mehul choksi in police custody in dominica
महत्त्वाच्या बातम्या
- ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी गुपचूप उरकले लग्न, नववधू कॅरी सायमंड्स 23 वर्षांनी लहान
- हॉटेल्ससह कोरोना लसीकरण पॅकेज देणार्या रुग्णालयांवर कारवाई केली जावी – केंद्राचे निर्देश
- Modi Government 2.0 : मोदी सरकारची 2 वर्षे पूर्ण, भाजप खासदार-आमदार जल्लोषाऐवजी गावोगावी भेट देणार
- गोव्याचा पर्यटनाचा बेत रद्दच करा ; संचारबंदी 7 जूनपर्यंत वाढविली
- Cyclone Yaas Effect Odisha : चक्रीवादळात बाळ जन्मले नाव ठेवले ‘यास’ !अरेच्चा तब्बल ७५० बाळांचा जन्म ! काय म्हणावे ‘ यास ‘ ?