विशेष प्रतिनिधी
जेरुसलेम – जगात कोरोनाचे संकट पुन्हा गंभीर होत असतानाच इस्राईलमध्ये फ्लोरोनाचा संसर्ग आढळला आहे. या आजाराचा एक रुग्ण देशात असल्याचे येथील सरकारने जाहीर केले आहे. फ्लोरोना हा कोरोना विषाणूचे ‘अल्फा’, ‘डेल्टा’ व ओमिक्रॉन या उत्प्रेरित प्रकार नसून कोरोना व इन्फ्लूएंझा विषाणूचा एकाचवेळी झालेला संसर्ग आहे.First patient of Florona found in world
पेटा टिकव्हा येथील राबीन वैद्यकीय केंद्रात प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला ‘फ्लोरोना’ची लागण झाल्याचे यात म्हटले आहे. या गर्भवतीने रोगविरोधक लस घेतलेली नव्हती, असा दावा रुग्णालयाने केला आहे. हा संसर्ग सौम्य असून आरोग्य मंत्रालय तपास करीत असल्याचे सांगण्यात आले.
कोरोना व इन्फ्लूएंझा या दोन विषाणूंचा संयोग झाल्यास गंभीर आजार होऊ शकतो, का याची चाचपणी सुरू आहे. अन्यण काही रुग्णांनाही दोन विषाणूंची संसर्ग झाला असण्याची व अद्याप त्याचे निदान झाले नसावे, अशी शक्यता आरोग्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
First patient of Florona found in world
महत्त्वाच्या बातम्या
- योगी आदित्यनाथांना मथुरेतून निवडणुकीसाठी उभे करण्याची जे. पी. नड्डांकडे मागणी, खासदाराने सांगितले भगवान श्रीकृष्णाच्या प्रेरणेने लिहिले पत्र
- बुल्लीबाई अॅप प्रकरणी बंगळुरुतील अभियंता ताब्यात, मुस्लिम महिलांची बदनामी केल्याचा आरोप
- माजी पत्नीनेच काढली लाज, म्हणाल्या हाच काय तो इम्रान खान यांचा नवा पाकिस्तान
- गोव्यात पुन्हा भाजपचीच सत्ता, आप बनणार प्रमुख विरोधी पक्ष, तृणमूल डब्यात, कॉँग्रेस गाळात