विशेष प्रतिनिधी
लंडन – ओमिक्रॉनमुळे जगभरात खळबळ माजली आहे. आफ्रिकेत ओमिक्रॉन आढळून आल्यानंतर या संसर्गाला बोट्स्वाना व्हेरिएंट असे म्हटले जात होते. परंतु हा व्हेरिएंट आफ्रिकेत आढळून येण्यापूर्वी लंडनमध्ये होता, असा दावा आफ्रिकी डॉक्टरांनी केला आहे.First amricon variant seen in UK
इस्त्राईलच्या तेल अवीवच्या शेबा मेडिकल कॉलेजचे डॉ. एलाड माओर यांनी लंडन येथे ओमिक्रॉनचे अस्तित्व आफ्रिकेत आढळून येण्यापूर्वीच होते, असे म्हटले आहे. १९ नोव्हेंबरला डॉ. माओर हे एका परिसंवादासाठी लंडनला गेले होते. तेथे १२०० आरोग्य तज्ञ जमले होते.
२३ नोव्हेंबरला घरी आल्यानंतर काही दिवसांत त्यांना कोरोनाचे लक्षणे दिसू लागले. २७ नोव्हेंबरला त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. या संसर्गाची बाधा लंडनमध्येच झाली, असा दावा त्यांनी केला.
संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस ॲन्टानिओ गुटरेस यांनी म्हटले की, प्रवासावर बंदी घालणे चुकीचे आणि गैर आहे. कोरोनाचा नवीन व्हेरिएंट आढळून आल्यानंतर काही देशांनाच लक्ष्य केले जात आहे. प्रवाशांची चाचणी वाढवण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.
वेगाने पसरणाऱ्या व्हायरसला कोणतीही मर्यादा नसून तो प्रवासावर बंधने घालून थांबणारा नाही, असेही त्यांनी नमूद केले.. आफ्रिकेत गेल्या आठवड्यात ओमिक्रॉनचा रुग्ण आढळून आल्यानंतर जगातील दहा-बारा देशांनी दक्षिण आफ्रिकेच्या प्रवासावर बंदी घातली आहे.
First amricon variant seen in UK
महत्त्वाच्या बातम्या
- सावधान, ओमायक्रॉनचा व्हॉटसअॅप स्टेटस ठेवला म्हणून तरुणाला झाली अटक
- कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचे नवा पक्ष काढण्याचे संकेत, प्रश्न विचारल्यास नेतृत्वाला अपमान वाटतो म्हणत गांधी कुटुंबियावर केली टीका
- इंस्टाग्राम आणि टिकटॉक वर एक्सेल शिकवणारे व्हिडीओ बनवुन ही तरुणी बनली कोट्यधीश
- जॅकलीन फर्नांडिस मुंबई विमानतळावरून ईडीच्या ताब्यात; २०० कोटींच्या खंडणी प्रकरणात कारवाई!!