• Download App
    जगात सर्वात आनंदी फिनलंड तर भारताचा क्रमांक १३६ वा, अफगणिस्थान शेवटच्या क्रमाकांवर|Finland is happiest in the world, India at 136th and Afghanistan at the bottom

    जगात सर्वात आनंदी फिनलंड तर भारताचा क्रमांक १३६ वा, अफगणिस्थान शेवटच्या क्रमाकांवर

    विशेष प्रतिनिधी

    जिनेव्हा : संयुक्त राष्ट्रांकडून जाहीर होणाऱ्या आनंदी देशांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर फिनलंड आहे. या यादीत सर्वात शेवटचा देश अफगणिस्थान असून भारताचा क्रमांक १३६ वा म्हणजे शेवटून अकरावा आहे.Finland is happiest in the world, India at 136th and Afghanistan at the bottom

    दरवर्षी जगातील सर्वात आनंदी देशांची यादी संयुक्त राष्ट्रांकडून जाहीर केली जाते. वैयक्तिक पातळीवर असणारं समाधान, चांगलं राहणीमान, जीडीपी, आयुर्मान अशा निरनिराळ्या घटकांच्या आधारे ही यादी तयार केली जाते. जगभरातल्या एकूण १५० देशांचं या घटकांच्या आधारे मूल्यमापन करण्यात येतं.



    यंदाच्या वर्षी अर्थात २०२२ ची यादी तयार करताना एकूण १४६ देशांचं मूल्यमापन करण्यात आलं आहे. या यादीमध्ये सध्या युद्ध सुरू असलेल्या रशिया आणि युक्रेनचा देखील समावेश असून ते अनुक्रमे ८० आणि ९८व्या स्थानावर आहेत.

    या यादीमध्ये सलग पाचव्या वर्षी फिनलँडला जगातला सर्वात आनंदी देश होण्याचा मान मिळाला आहे. फिनलँडच्या पाठोपाठ डेन्मार्क, आईसलँड, स्वित्झर्लंड, नेदरलँड, लग्झेंबर्ग, स्विडन, नॉर्वे, इस्त्रायल आणि न्यूझीलंड या ९ देशांचा क्रम लागतो. पहिल्या १० मध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत फक्त एक बदल झाला

    असून आॅस्ट्रिया या यादीतून बाहेर गेला आहे. इतर देशांचा फक्त क्रम बदलला असून ते पहिल्या दहामध्ये कायम आहेत.या यादीमध्ये अफगाणिस्तान सर्वात शेवटच्या म्हणजेच १४६व्या स्थानी आहे. अफगाणिस्तानपाठोपाठ लेबेनॉन आणि झिम्बाब्वे हे देश सर्वात कमी आनंदी ठरले आहेत.

    जगातील सर्वात आनंदी देशांच्या यादीमध्ये भारताचं स्थान मात्र बरचसं मागे आहे. १४६ देशांच्या यादीमध्ये भारत थेट १३६व्या क्रमांकावर म्हणजे शेवटून ११व्या क्रमांकावर आहे.
    ही यादी तयार करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या गटाकडून विशिष्ट पद्धतीचा अवलंब करण्यात येतो.

    भ्रष्टाचाराविषयी नागरिकांचं मत, आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणण्याचं स्वातंत्र्य, आयुर्मान, सामाजिक पाठिंबा, जीडीपी, राहण्याच्या ठिकाणाविषयीचं समाधान अशा काही बाबींचं मूल्यमापन ही यादी तयार करताना केलं जातं.

    दरवषीर्ची यादी तयार करण्यासाठी प्रामुख्याने गेल्या तीन वर्षांमधल्या परिस्थितीचा आढावा घेतला जातो. या निकषांवर देशांना ० ते १० या दरम्यान मूल्यांकन दिलं जातं. अशी यादी जाहीर करण्याचं यंदाचं हे दहावं वर्ष आहे.

    Finland is happiest in the world, India at 136th and Afghanistan at the bottom

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    American Pope : नवीन पोपची घोषणा झाली, रॉबर्ट प्रीव्होस्ट सर्वात मोठे ख्रिश्चन धर्मगुरू, पहिले अमेरिकी पोप

    Pakistan PM : ऑपरेशन सिंदूरनंतर पाक पंतप्रधानांचा जळफळाट- आम्ही बदला घेऊ; संसदेत 5 भारतीय विमाने पाडल्याचा दावा

    Donald Trump : ट्रम्प यांनी UNची 19 हजार कोटींची मदत रोखली; 3000 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची योजना