Facebook Data leaks : 50 कोटींहून अधिक फेसबुक वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती लीक झाली आहे. फेसबुकच्या लीक झालेल्या डेटामध्ये ईमेल अॅड्रेस आणि फोन नंबरसह सर्व वैयक्तिक माहिती समाविष्ट आहे. एका रिपोर्टवरून ही माहिती मिळाली. त्याच वेळी डेटा लीकमुळे बलाढ्य सोशल मीडिया कंपनीला विचारण्यात आले तेव्हा त्यांनी सांगितले की, ही रिपोर्ट जुनी आहे. Facebook Data leaks of more than 50 crore users, risk of your private information becoming public
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : 50 कोटींहून अधिक फेसबुक वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती लीक झाली आहे. फेसबुकच्या लीक झालेल्या डेटामध्ये ईमेल अॅड्रेस आणि फोन नंबरसह सर्व वैयक्तिक माहिती समाविष्ट आहे. एका रिपोर्टवरून ही माहिती मिळाली. त्याच वेळी डेटा लीकमुळे बलाढ्य सोशल मीडिया कंपनीला विचारण्यात आले तेव्हा त्यांनी सांगितले की, ही रिपोर्ट जुनी आहे.
मीडिया रिपोर्ट्स आणि सायबर तज्ज्ञांच्या मते, 50 कोटींहून अधिक फेसबुक वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती हॅकर्सकडे देण्यात आली आहे. 2019 मध्ये लीक झालेल्या या डेटामध्ये ईमेल पत्ता, मोबाइल नंबर, बँक खाते यासारखी सर्व माहिती आहेत. हडसन रॉक सायबर क्राइम इंटेलिजेंस फर्मचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी एलोन गॉल यांनी शनिवारी ट्विट केले की, फेसबुकच्या 53 कोटी वापरकर्त्यांची खासगी माहिती लीक झाली आहे.
बिझनेस इनसाइडरच्या अहवालानुसार, लीक झालेल्या डेटापैकी फोन नंबरसह काही माहिती ही सध्याची आहे. याचा अर्थ असा आहे की, आपणदेखील फेसबुक वापरत असाल तर फेसबुक खात्यासाठी वापरलेला फोन नंबर लीक झाल्याची शक्यता आहे.
फेसबुक म्हणतंय, हे जुनेच प्रकरण
एलन गॅलने वापरकर्त्यांच्या डेटा लीकबद्दल फेसबुकवर टीका केली होती. याला फेसबुकचा बेजबाबदारपणाही ठरवण्यात आले होते. जेव्हा सायबर क्राइम तज्ज्ञ आणि वापरकर्त्यांनी फेसबुकवरून डेटा गळतीवर टीका केली तेव्हा कंपनीने हे जुनेच प्रकरण असल्याचे म्हटले आहे. फेसबुकच्या प्रवक्त्याने सांगितले की, ज्या डेटाविषयी बोलले जात आहे तो एक जुना अहवाल आहे, जो 2019 मध्ये लीक झाल्याची बातमी आली होती. प्रवक्त्याने सांगितले की, ऑगस्ट 2019 मध्ये आम्हाला याबद्दल माहिती मिळाली आणि आम्ही लवकरच त्यात सुधारणा केली.
Facebook Data leaks of more than 50 crore users, risk of your private information becoming public
महत्त्वाच्या बातम्या
- नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 22 जवान शहीद, शोध मोहीम सुरूच; 700 जवानांना घेरून केला होता हल्ला
- Railway Recruitment 2021: रेल्वेमध्ये पॅरामेडिकल पदांवर भरती, 75 हजारांपर्यंत पगार, आजच करा अर्ज
- दलित लेखकाने सरस्वती सन्मान का स्वीकारावा? डॉ. शरणकुमार लिंबाळे यांनी आपल्या लेखातून दिले उत्तर
- गीता प्रेसचे अध्यक्ष राधेश्याम खेमका यांचे निधन, 40 वर्षांपासून विविध धार्मिक पत्रिकांचे केले संपादन
- अभिनेता अक्षय कुमारला कोरोनाची लागण, घरीच क्वारंटाइन होऊन घेतोय उपचार