• Download App
    फेसबुकनेही मान्य केले कोरोना व्हायरस लॅबमध्येच बनविला, आता कोरोना मानवनिर्मित असल्याच्या पोस्ट डिलीट होणार नाहीत|Facebook also admits that the Corona virus was created in the lab, now posts made by Corona will not be deleted.

    फेसबुकनेही मान्य केले कोरोना व्हायरस लॅबमध्येच बनविला, आता कोरोना मानवनिर्मित असल्याच्या पोस्ट डिलीट होणार नाहीत

    कोरोना व्हायरस लॅबमध्येच बनविला गेला असल्याची शक्यता आता फेसबुकनेही मान्य केली आहे. त्यामुळे कोरोना व्हायरस मानवनिर्मित असल्याच्या पोस्ट फेसबुककडून डिलीट होणार नाहीत. आत्तापर्यंत कोरोना व्हायरस मानवनिर्मित असल्याबाबत कोणतीही पोस्ट असली तरी फेसबुककडून डिलीट केली जात होती.Facebook also admits that the Corona virus was created in the lab, now posts made by Corona will not be deleted.


    विशेष प्रतिनिधी

    न्यूयॉर्क : कोरोना व्हायरस लॅबमध्येच बनविला गेला असल्याची शक्यता आता फेसबुकनेही मान्य केली आहे. त्यामुळे कोरोना व्हायरस मानवनिर्मित असल्याच्या पोस्ट फेसबुककडून डिलीट होणार नाहीत.

    आत्तापर्यंत कोरोना व्हायरस मानवनिर्मित असल्याबाबत कोणतीही पोस्ट असली तरी फेसबुककडून डिलीट केली जात होती.कोरोना व्हायरसचा उद्रेक सुरू झाल्यापासून च हे षडयंत्र आहे अशी कॉन्स्पिरसी थेअरी मांडली जात होती.



    चीनने जगात तिसरे महायुध्द सुरू करण्यासाठी कोरोना व्हायरस तयार केला. कोरोना वुहान लॅबमध्ये बनल्याचे दावे पहिल्या लाटेपासून केले जात होते. मात्र, फेसबुकने यासंबंधतातील पोस्ट दिसताच ती थेट डिलीट करून टाकण्याची निती अवलंबिली होती.

    आता फेसबुकने यामध्ये बदल केला आहे. कोरोना लॅबमध्ये बनविला असे सांगणाऱ्या पोस्ट आधी फेसबुक डिलीट करत होते, मात्र आता ते हटविण्यास नकार दिला आहे.

    फेसबुक प्रवक्त्याच्या हवाल्यान दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, कोरोनाच्या जन्माची तपासणी सुरु आहे, यामुळे तज्ज्ञांचे मत घेतल्यानंतर आम्ही अशा पोस्ट बॅन करायचे बंद केले आहे.

    यापुढे कोरोनाची उत्पत्ती लॅबमध्ये किंवा मानवनिर्मित असल्याचे दावे करणारी पोस्ट डिलीट केली जाणार नाहीत. आमची टीम तज्ज्ञांचे संपर्कात आहे. त्यांच्या सल्ल्यानंतर आम्ही आमची पॉलिसी बदलली आहे, असे तो म्हणाला.

    याआधी कोरोना लॅबमध्ये निर्माण करण्यात आल्याचे दावे फेसबुक फेक म्हणजे खोटे असल्याचे मानत होती.गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये फेसबुकने म्हटले होते की, कोरोना लसीबाबतच्या अफवा फेसबुक डिलीट करणार आहे.

    नुकताच वुहान लॅबमध्ये कोरोनाची उत्पत्ती झाल्याचा रिपोर्ट समोर आला होता. यावर अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष बायडेन यांनी गुप्तचर संस्थांना लवकरात लवकर याचा शोध घेण्याचे आदेश दिले होते.

    Facebook also admits that the Corona virus was created in the lab, now posts made by Corona will not be deleted.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या