• Download App
    तालिबानच्या घोषणा, मजकुरामुळे फेसबुक धास्तावले, समर्थक माहितीवर बंदी घालण्याचा आदेश|Face Book bans Taliban for information sharing

    तालिबानच्या घोषणा, मजकुरामुळे फेसबुक धास्तावले, समर्थक माहितीवर बंदी घालण्याचा आदेश

    विशेष प्रतिनिधी

    लंडन – तालिबानचे नेते घोषणा करण्यासाठी फेसबुक आणि ट्विटरसारख्या समाजमाध्यमांचा मोठ्या प्रमाणावर वापर करत असल्याचे आढळून आल्यानंतर या बड्या कंपन्या सावध झाल्या आहेत.Face Book bans Taliban for information sharing

    फेसबुकने आता तालिबान आणि त्यांच्याशी संबंधित मजकूर व्हायरल करण्यावर पूर्णपणे बंदी घातली आहे. तालिबानशी संबंधित मजकुरावर लक्ष ठेवण्याबरोबरच तो हटविण्यासाठी फेसबुकने एक वेगळी टीमच तयार केली आहे.



    स्थानिक दारी आणि पश्तून भाषेची माहिती असणारे लोक नेमण्यात आले असून ते स्थानिक कंटेटवर लक्ष ठेवण्याचे काम करतील. इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲपला देखील हेच धोरण लागू करण्यात आले आहे.

    अमेरिकी कायद्यानुसार तालिबानवर बंदी घालण्यात आली आहे. या संघटनेकडून चालविण्यात येणारी अकाउंट हटविण्यात येतील तसेच त्यांची स्तुती करणारा, त्यांना पाठिंबा देणारा मजकूर काढून टाकण्यात येईल, असे फेसबुकच्या प्रवक्त्याने सांगितले.

    Face Book bans Taliban for information sharing

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Former Federal Reserve : माजी फेडरल रिझर्व्ह गव्हर्नरने ट्रम्प यांच्यावर खटला दाखल केला; लिसा कुक यांना 3 दिवसांपूर्वी काढून टाकले

    France Returns King Toera : फ्रान्सने मादागास्करच्या राजाची कवटी परत केली; 128 वर्षांपूर्वी शिरच्छेद करून फ्रेंच सैनिकांनी नेली होती

    America : अमेरिका रशियासोबत व्यापार करू इच्छिते; बंदी उठवण्याचा विचार; रशियन अणुऊर्जा जहाजे खरेदी करण्याची तयारीही