Extremists Attack On Durga Puja Pandal In Bangladesh : बांगलादेशात दुर्गा पूजेच्या निमित्ताने कट्टरपंथीयांनी अनेक पूजा मंडपांवर हल्ला केला आणि मूर्तींची तोडफोड केली. या घटनेनंतर पश्चिम बंगालमध्येही राजकीय खळबळ उडाली आहे. पश्चिम बंगालच्या सत्ताधारी पक्षाचे टीएमसीचे नेते आणि प्रवक्ते कुणाल घोष यांनी याप्रकरणी बांगलादेश सरकारकडून कारवाई करण्याची आणि केंद्र सरकारच्या त्वरित हस्तक्षेपाची मागणी करत म्हटले आहे की, ज्या प्रकारे अल्पसंख्याक भारतात सुरक्षित आहेत, त्याच प्रकारे बांगलादेशमधील अल्पसंख्याकांची सुरक्षा असायला हवी. Extremists Attack On Durga Puja Pandal In Bangladesh After Rumors Spread
वृत्तसंस्था
ढाका : बांगलादेशात दुर्गा पूजेच्या निमित्ताने कट्टरपंथीयांनी अनेक पूजा मंडपांवर हल्ला केला आणि मूर्तींची तोडफोड केली. या घटनेनंतर पश्चिम बंगालमध्येही राजकीय खळबळ उडाली आहे. पश्चिम बंगालच्या सत्ताधारी पक्षाचे टीएमसीचे नेते आणि प्रवक्ते कुणाल घोष यांनी याप्रकरणी बांगलादेश सरकारकडून कारवाई करण्याची आणि केंद्र सरकारच्या त्वरित हस्तक्षेपाची मागणी करत म्हटले आहे की, ज्या प्रकारे अल्पसंख्याक भारतात सुरक्षित आहेत, त्याच प्रकारे बांगलादेशमधील अल्पसंख्याकांची सुरक्षा असायला हवी.
अलीकडच्या काळात बांगलादेशात कट्टरपंथी शक्तींचा प्रभाव वाढत असल्याचे दिसते. याआधीही काही दिवसांपूर्वी हिंदू मंदिरे आणि मूर्तींची तोडफोड करण्यात आली होती. केंद्रीय राज्यमंत्री आणि पश्चिम बंगालचे खासदार शांतनु ठाकूर यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून या संदर्भात त्वरित हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती.
बांगलादेशात दुर्गा पूजेच्या निमित्ताने उभारण्यात आलेल्या सार्वजनिक उत्सव मंडपावर धार्मिक कट्टरतावाद्यांनी हल्ला चढवला आणि मूर्तींची तोडफोड केली. बांगलादेश हिंदू एकता परिषदेने ट्विट करून ही माहिती दिली. 13 ऑक्टोबर 2021 दिवस हा बांगलादेशच्या इतिहासातील काळा दिवस ठरला. अष्टमीच्या दिवशी मूर्ती विसर्जनाच्या निमित्ताने अनेक पूजा मंडपांची तोडफोड करण्यात आली. हिंदू आता पूजा मंडपांचे रक्षण करत आहेत. आज संपूर्ण जग गप्प आहे. जगातील सर्व हिंदूंवर माँ दुर्गेचे आशीर्वाद राहो. त्यांना कधीही क्षमा करू नका.”
परिषदेने ट्विटमध्ये म्हटले आहे की, बांगलादेशमध्ये चांगले मुस्लिम अजूनही जिवंत आहेत त्यामुळेच आम्ही जिवंत आहोत. हिंदूंच्या पाठीशी उभे राहिलेल्या सर्व मुस्लिमांचे आभार. आम्ही इस्लामचाही आदर करतो. आम्हाला कुराणदेखील आवडते. इस्लाम कधीही हिंसेचे समर्थन करत नाही. हिंदू एकता परिषदेने म्हटले की, आम्हाला बांगलादेशातील आमच्या मुस्लिम बांधवांशी सुसंवादाने राहायचे आहे. या घटनेबद्दल लोकांमध्ये संताप आहे. सोशल मीडियावर हा मुद्दा ट्रेंड होत आहे, ज्यावर युजर्सची तीव्र प्रतिक्रियाही दिसून येत आहे.
मंत्रालयाचे शांतता राखण्याचे आवाहन
बांगलादेश स्टुडंट्स लीगने एक प्रसिद्धिपत्रक जारी केले आहे, ज्यात आपल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पूजा मंडपात राहण्यास सांगत आहे. बांगलादेशच्या धार्मिक मंत्रालयानेही या संदर्भात निवेदन जारी केले आहे. मंत्रालयाने सर्वांना शांतता आणि सौहार्द राखण्याचे आवाहन केले. गुरुवारी एका ट्विटमध्ये परिषदेने म्हटले की, ‘गेल्या २४ तासांत काय घडले ते आम्ही एका ट्विटमध्ये सांगू शकत नाही. बांगलादेशच्या हिंदूंनी काही लोकांचा खरा चेहरा पाहिला. आम्हाला माहिती नाही की भविष्यात काय होईल. पण बांगलादेशचे हिंदू 2021ची दुर्गा पूजा कधीही विसरणार नाहीत. #SaveBangladeshiHindus’
अफवांमुळे परिस्थिती बिघडली
तत्पूर्वी बुधवारी परिषदेने ट्विट केले होते की, कुराणचा अपमान केल्याच्या अफवा पसरत आहेत. यामुळे ननुआ दिघी पारच्या पूजा मंडपावर हल्ला झाला आहे. यानंतर एका निवेदनात म्हटले होते की, आम्ही सर्व मुस्लिम बांधवांना अफवांवर विश्वास ठेवू नये असे सांगू इच्छितो. आम्ही कुराणचा आदर करतो. कोणीतरी दंगल भडकवण्याचा विचार करत आहे. कुराण आणि दुर्गापूजेचा संबंध नाही. निष्पक्ष चौकशी होईल. कृपया कोणत्याही हिंदू किंवा मंदिरावर हल्ला करू नका.”
Extremists Attack On Durga Puja Pandal In Bangladesh After Rumors Spread
महत्त्वाच्या बातम्या
- नवाब मलिक म्हणाले, हे लोक तंबाखू आणि गांजामध्ये फरक करू शकत नाहीत, NCB ने जावयाच्या जामिनाविरोधात उच्च न्यायालय गाठले
- बीएसएफच्या अधिकार क्षेत्रात वाढीवर पंजाबचे आजी-माजी मुख्यमंत्री भिडले, कॅप्टन म्हणाले – देश मजबूत होईल, तर चन्नींचे केंद्रावर आरोप
- ‘महिला आयोगावर रावणाला मदत करणारी शूर्पणखा नको!’, चित्रा वाघ यांचा नाव न घेता रूपाली चाकणकरांवर हल्लाबोल
- चंद्रकांत पाटलांचे मोठे विधान ; म्हणाले – “केंद्राची ऑफर न स्विकारण्याइतके पवारसाहेब कच्च्या गुरुचे चेले नाहीत”
- सीमा सुरक्षा दलाची कार्यकक्षा वाढविली; पंजाब आणि बंगाल सरकारांना टोचली!!