विशेष प्रतिनिधी
रॉटरडॅम – तब्बल आठवडाभर सुएझ सुएझ कालव्यात ‘ट्रॅफिक जॅम’ करणारे महाकाय एव्हरगिव्हन जहाज चार महिन्यानंतर आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी रॉटरडॅम येथे पोचले. सुएझ कालव्यात जहाज अडकल्यामुळे सुमारे ४२ अब्ज पौंडचा व्यापार ठप्प पडला होता.Evergiver ship complete its journey
या जहाजाचे संचलन भारतीय चालक दलाकडून केले जात होते आणि आता या जहाजावरून माल उतरवला जात असल्याचे वृत्तसंस्थेने म्हटले आहे. एव्हरगिव्हन जहाज हे अमझोनेव्हन येथे पोचले असून नियोजित वेळेपेक्षा या जहाजाला येण्यास खूप विलंब झाला आहे.
पनामाचा ध्वज असलेले हे जहाज २३ मार्च रोजी सुएझ कालव्यात अडकले होते. त्याला तेथून बाहेर काढण्यासाठी एक आठवडा लागला होता. यादरम्यान तेथे जहाजांची रांग लागली होती.
एव्हर गिव्हन जहाजाचे संचलन २५ जणांच्या भारतीय पथकाकडून केले गेले. सध्या जहाजातून सामान उतरवण्याचे काम सुरू असून ते सोमवारपर्यंत या ठिकाणीच थांबणार आहे. त्यानंतर हे जहाज फ्रान्सला रवाना होणार असून तेथे त्याची तपासणी केली जाणार आहे.
Evergiver ship complete its journey
महत्त्वाच्या बातम्या
- बिहारी गुंडा म्हणणाऱ्या महुआ मोईत्रा यांच्यावर तेजस्वी यादव यांनी व्यक्त केला संताप
- अरुणाचल प्रदेश आणि अक्साई चीन दाखविण्याचा चीनचा खोडसाळपणा, चीनच्याच सीमाशुल्क विभागाने उधळला कट
- अतिवृष्टीमुळे राज्यात रस्त्यांचे १,८०० कोटींचे नुकसान; गडकरींशी चर्चा; अशोक चव्हाण यांची माहिती
- अनिल देशमुख, ऋषिकेश देशमुख यांना ED चे नवे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश