• Download App
    भारताचा आणखी एक शत्रू संपला! लष्कर कमांडर अक्रम गाझीची पाकिस्तानात गोळ्या झाडून हत्या|enemy of India is over Army Commander Akram Ghazi shot dead in Pakistan

    भारताचा आणखी एक शत्रू संपला! लष्कर कमांडर अक्रम गाझीची पाकिस्तानात गोळ्या झाडून हत्या

    • 2018 ते 2020 या काळात लष्कर ए तैयबाच्या भरतीचेही काम पाहिले होते

    विशेष प्रतिनिधी

    इस्लामाबाद : भारताचा आणखी एक शत्रू पाकिस्तानात मरण पावला. लष्कर-ए-तैयबाचा माजी कमांडर अक्रम खान उर्फ ​​अक्रम गाझी याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. अक्रम भारताविरुद्ध कायमच विष ओकायचा. त्याने 2018 ते 2020 या काळात लष्कर ए तैयबाच्या भरतीचेही काम पाहिले होते.enemy of India is over Army Commander Akram Ghazi shot dead in Pakistan



    पाकिस्तानातील बाजौरमध्ये गुरुवारी अक्रम गाझी याची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. अक्रम हा लष्कराच्या प्रमुख कमांडरांपैकी एक आहे. तो बराच काळ दहशतवादी कारवायांमध्ये सामील होता.

    पाकिस्तानमध्ये अशा प्रकारे दहशतवाद्यांना लक्ष्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी मुफ्ती कैसर फारुख, खलिस्तानी दहशतवादी परमजीत सिंग पंजवाड, एजाज अहमद अहंगर, बशीर अहमद पीर यांसारख्या अनेक दहशतवाद्यांनाही अज्ञात हल्लेखोरांनी ठार केले होते.

    enemy of India is over Army Commander Akram Ghazi shot dead in Pakistan

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Canada : कॅनडात मंदिराच्या भिंतीवर लिहिल्या खलिस्तानी घोषणा; नगर कीर्तनापूर्वी कारवाई

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार