विशेष प्रतिनिधी
न्यूयॉर्क : इतिहासातील सर्वात मोठी देणगी देऊन जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि उद्योगपती एलोन मस्क जणू कर्णाचा अवतार बनला आहे. मात्र, हा सगळा दानशूरपणा कर वाचविण्यासाठी केला असल्याचेही उघडकीस आले आहे.Elon Musk the incarnation of the Karna, but all the generosity to save taxes
फोर्ब्सच्या अहवालानुसार, मस्क यांनी नोव्हेंबर 2021 मध्ये टेस्लाचे 5 अब्ज डॉलर (सुमारे 45 हजार कोटी रुपये) शेअर्स एका अज्ञात चॅरिटीला दान केले आहेत. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनच्या फाइलिंगनुसार, मस्क यांनी नोव्हेंबरमध्ये 10 दिवसांच्या कालावधीत 5,044,000 टेस्ला शेअर्स ट्रान्सफर केले.
युनायटेड नेशन्सच्या एका कार्यक्रमाबद्दलच्या लेखाला उत्तर देताना, एलन यांनी ट्विट केले की जर कोणी त्यांच्या पैशाने जगाची भूक कशी संपेल हे समजावून सांगू शकले तर मी 6 अरब डॉलर दान देईल. इतिहासातील कोणत्याही धमार्दाय संस्थेला दिलेली ही सर्वात मोठी रक्कम असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. मात्र, ज्या ट्रस्टला देणगी देण्यात आली त्या ट्रस्टचे नाव कागदपत्रांमध्ये उघड करण्यात आलेले नाही.
यामागचे कारणही समोर आले आहे. नोव्हेंबरमध्ये, मस्क यांनी त्यांच्या फॉलोअर्सला ट्विट करत विचारले की, कर टाळण्याच्या आरोपांचा प्रतिकार करण्यासाठी टेस्लामधील 10% स्टॉकची विक्री करावी का? ज्याला 3.5 दशलक्ष मतदारांपैकी जवळपास 58% मतदारांनी होय म्हटले होते. ट्विटरवर त्यांचे 7.39 कोटी फॉलोअर्स आहेत. म्हणजेच 4.29 कोटी फॉलोअर्सनी होकारार्थी उत्तर दिले होते.
टेस्लाचे सीईओ आणि राजकारणी यांच्यात सुरू असलेल्या संघषार्नंतर ही देणगी घेण्यात आली आहे. या राजकारण्यांमध्ये बर्नी सँडर्स आणि एलिझाबेथ वॉरनसारख्या लोकांचा समावेश होता. या लोकांनी एलन मस्क सारख्या अब्जाधीशांच्या शेअर्स आणि इतर मालमत्तेवर कर लावण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यांचे लक्ष्य विशेषत: एलन मस्क यांच्या वैयक्तिक मालमत्तेवर होते.
मंगळवारी शेअर बाजारातील तेजीमुळे एलन मस्कच्या नेटवर्थमध्ये प्रचंड वाढ झाली. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, एलन मस्क यांच्या एकूण संपत्तीत 8 बिलियन डॉलर (म्हणजे 60 हजार कोटी) पेक्षा जास्त वाढ झाली आहे. तर या वर्षी नेटवर्थमधून 35 बिलियन डॉलर (म्हणजे 2.60 लाख कोटी रुपये) पेक्षा जास्त घट झाली आहे.
Elon Musk the incarnation of the Karna, but all the generosity to save taxes
महत्त्वाच्या बातम्या
- तिजोरी रिकामी करू पण लस घरोघरी पोहोचवू, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आमच्यासाठी देशवासियांचा जीव अनमोल
- रामायण मालिकेतील कलाकार म्हणते मला करायचा होता शाहिद आफिदीसोबत सेक्स
- सहकार अपील न्यायाधिकरणाचे माजी अध्यक्ष तुकाराम हरे यांचे निधन
- NSA अजित डोवाल यांच्या घरात घुसखोरीचा प्रयत्न, पकडल्यावर आरोपी म्हणाला – ‘शरीरात चिप लावून कुणीतरी कंट्रोल करतंय!’