विशेष प्रतिनिधी
न्यूयॉर्क – इलेक्ट्रिक मोटार उत्पादक कंपनी टेस्लाचे सीईओ आणि जगातील सर्वांत धनवान व्यक्ती एलन मस्क यांनी दुसऱ्यांदा टेस्लाच्या शेअरची विक्री केली आहे. यावेळी मस्क यांनी नऊ अब्ज डॉलर किमतीचे शेअर विकले आहेत.Elan Musk sold out his lot of shares of Tesla
एलन मस्क यांनी ७ नोव्हेंबरला ट्विटरवरवरुन एक अंदाज घेतला होता. ‘करापासून बचाव करण्यासाठी टेस्लातील दहा टक्के हिस्सेदारी विकण्याचा माझा प्रस्ताव आहे,’ असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले होते. त्यावर तब्बल ३५ लाख लोकांनी त्यांचे विचार व्यक्त केले होते, सल्ले दिले होते.
यापैकी ५७.९ टक्के लोकांनी शेअर विक्रीचे समर्थन केले होते तर ४२.१ टक्के लोकांनी विरोध दर्शविला होता. यानंतर एलन मस्क यांनी शेअर विकले. त्यांच्याकडे २.२ अब्ज डॉलरचे २१ लाख शेअर होते. त्यातील सुमारे नऊ लाख डॉलर किमतीच्या नऊ लाख ३४ हजार ९१ शेअरची विक्री केली. सध्या टेस्लाचा शेअर एक हजार १३७ डॉलरवर (अंदाजे ८४ हजार ४९१ रुपये) पोचला आहे.
Elan Musk sold out his lot of shares of Tesla
महत्त्वाच्या बातम्या
- सरकार तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल, सुधीर मुनगंटीवार यांची महाविकास आघाडी सरकारवर टीका
- कोरोना लसीच्या बुस्टर डोसची गरज नाही, आयसीएमआरने केले स्पष्ट
- कृषि कायदे रद्द केल्याने झळाळून उठली पंतप्रधानांची प्रतिमा, मोदीच खरे शेतकरी समर्थक असल्याचे सर्व्हेक्षणात नागरिकांनी केले व्यक्त
- पाकव्याप्त काश्मीर परत मिळविणे सरकारचा पुढचा अजेंडा, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांचा विश्वास