• Download App
    सुवेझ कालवा जाम करणारे एव्हर गिव्हन जहाज इजिप्तने केले जप्त, मागितली ९०० मिलीयन डॉलर्सची भरपाई Egypt seizes Ever given ship stranded on Suez Canal, demands 900 million in damages

    सुवेझ कालवा जाम करणारे एव्हर गिव्हन जहाज इजिप्तने केले जप्त, मागितली ९०० मिलीयन डॉलर्सची भरपाई

    सुएझ कालव्यात अडकलेल्या एव्हर गिव्हन या जहाजामुळे उत्पन्न बुडाल्याने ९०० मिलीयन डॉलर्स नुकसान भरपाई मिळविण्यासाठी इजिप्तने हे भले मोठे जहाजच जप्त केले आहे. सुएझ कालवा प्रशासनाने इस्लामिया न्यायालयाकडे जहाज जप्त करण्याची परवानगी मागितली होती. न्यायालयाने ही परवानगी दिली आहे. या जहाजावर २५ भारतीय कर्मचारी आहेत. Egypt seizes Ever given ship stranded on Suez Canal, demands 900 million in damages


    विशेष प्रतिनिधी

    कैरो : सुएझ कालव्यात अडकलेल्या एव्हर गिव्हन या जहाजामुळे उत्पन्न बुडाल्याने ९०० मिलीयन डॉलर्स नुकसान भरपाई मिळविण्यासाठी इजिप्तने हे भले मोठे जहाजच जप्त केले आहे. सुएझ कालवा प्रशासनाने इस्लामिया न्यायालयाकडे जहाज जप्त करण्याची परवानगी मागितली होती. न्यायालयाने ही परवानगी दिली आहे. या जहाजावर २५ भारतीय कर्मचारी आहेत.

    सुएझ कालव्यात अडकलेले 1300 फुट लांब असलेले एव्हर गिव्हन हे जहाज मोकळे करण्यासाठी लाखो टन वाळू उपसावी लागली. त्याचबरोबर या मार्गावरील वाहतूक ठप्प पडली होती.



    इजिप्तच्या ताब्यात असलेला सुवेझ कालवा हा जागतिक व्यापारउदिमासाठी महत्त्वाचा मानला जातो. सुएझ कालव्यामुळे आशिया आणि युरोप खंडातील जलवाहतूक शक्य झाली. 23 मार्च रोजी चीनहून नेदरलँडला जाणारं मालवाहू जहाज सुएझ कालव्यात अडकलं होतं. जहाज अडकल्याने जगभरातील व्यापारावर याचा मोठा परिणाम झाला. सुएझ कालवा बंद झाल्याने खनिज तेलाच्या किमती सहा टक्क्यांनी वाढल्या होत्या.

    मात्र इजिप्तने हे पाऊल उचलल्यामुळे कायदेशिर तिढा निर्माण होणार आहे. सुवेझ कालवा ऑथॉरिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओसामा राबी यांनी सांगितले की नुकसान भरपाईसाठी जहाजाची मालकी असलेल्या जपानच्या कंपनीशी चर्चा सुरू आहे. जहाजाच्या विम्यामध्ये थर्ड पार्टी नुकसानाचीही तरतूद आहे.

    नुकसानभरपाई म्हणून मागितलेली रक्कम प्रचंड असली तरी जहाज कंपनी आणि त्यांची विमा कंपनी चर्चा करण्यास तयार आहे. मात्र, तरीही जहाज जप्त केल्याने आम्ही निराश झालो आहोत, असे कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले. नुकसान भरपाई दिल्याशिवाय इजिप्त या जहाजाला सोडणार नाही.त्याचबरोबर जहाजावरील कर्मचाºयांनाही मुक्त करणार नाही, हे योग्य नसल्याचेही कंपनीने म्हटले आहे.

    इजिप्तमध्ये असलेला सुएझ कालवा भूमध्य समुद्राला लाल समुद्राशी जोडतो. हा कालवा 193 किलोमीटर लांब आहे. आशिया आणि युरोप यांच्यातील हा कालवा सर्वांत छोटी लिंक आहे. सुएझ कालवा मालवाहतुकीसाठी 1869 मध्ये सुरू करण्यात आला. सुवेझ कालवा सुरू होण्याच्या अगोदर पूर्व आणि पश्चिमेच्या देशातून ये-जा करणारी मालवाहतूक करणारी जहाजं दक्षिण अफ्रिकेच्या केप ऑफ गुड होपला वळसा घालून प्रवास करत.

    Egypt seizes Ever given ship stranded on Suez Canal, demands 900 million in damages


    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Shahbaz : PAK पंतप्रधानाचा खोटारडेपणा; शाहबाज म्हणाले- भारताकडून आधी युद्धबंदीचे उल्लंघन; रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढणार

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    American Pope : नवीन पोपची घोषणा झाली, रॉबर्ट प्रीव्होस्ट सर्वात मोठे ख्रिश्चन धर्मगुरू, पहिले अमेरिकी पोप