• Download App
    अबब... इजिप्तमध्ये सापडली तब्बल तीन हजार वर्षांपूर्वीची सुवर्णनगरी | Egypt get anncient gold city

    अबब… इजिप्तमध्ये सापडली तब्बल तीन हजार वर्षांपूर्वीची सुवर्णनगरी

    वृत्तसंस्था

    कैरो – इजिप्तमध्ये दक्षिणेकडील लक्सर शहरामध्येच तीन हजार वर्षांपूर्वी लुप्त झालेल्या सुवर्णनगरीचे अवशेष सापडले आहेत. काही दिवसांपूर्वी संशोधकांनी राजा तुतानखामेन याच्या मुलाची कबर शोधून काढली होती, त्यापाठोपाठचे हे सर्वांत मोठे संशोधन मानले जात आहे. Egypt get anncient gold city

    उत्खननामध्ये सापडलेल्या नगराचे नाव हे ॲटेन असे असून इजिप्तचा राजा अमेनहोतेप (तृतीय) याने हे शहर वसविल्याचे बोलले जाते. या राजघराण्याने इसवीसनपूर्व १३९१ ते १३५३ या काळात इजिप्तवर राज्य केले होते. सध्याच्या लक्सर शहराच्या पश्चि्म दिशेला या शहराचे अवशेष आढळून आले आहेत.



    तुतानखामेनच्या कबरीनंतर हे देशातील सर्वांत मोठे संशोधन आहे. यामुळे अतिप्राचीन इजिप्तमधील लोकजीवन समजून घेण्यास मदत होईल. या प्राचीन शहराच्या अवशेषांमुळे स्थानिक पातळीवर पर्यटनाला चालना मिळू शकते, असेही संशोधकांनी म्हटले आहे.

    या संशोधनाची बातमी सोशल मीडियामध्ये व्हायरल झाल्यानंतर इजिप्तॉलॉजी हा ट्रेंड विशेष चर्चेत आला होता. अनेकांनी संशोधकांचे कौतुक केले आहे. अन्य देशांमधील असंख्य संशोधकांनी याआधीही या शहराचा शोध घेतला होता पण त्यांना ते शोधता आले नव्हते.

    Egypt get anncient gold city

    हे ही वाचा

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या