• Download App
    इस्रायल आणि हमास यांच्यात युद्धविराम प्रस्थापित करण्याचे प्रयत्न तीव्र! फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष कतारला रवाना|Efforts to establish a ceasefire between Israel and Hamas intensify French President leaves for Qatar

    इस्रायल आणि हमास यांच्यात युद्धविराम प्रस्थापित करण्याचे प्रयत्न तीव्र! फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष कतारला रवाना

    • इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्धविराम शुक्रवारी संपला, त्यानंतर पुन्हा हिंसाचार सुरू झाला.

    दुबई : इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धविरामासाठीचे प्रयत्न तीव्र झाले आहेत. शनिवारी, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन म्हणाले की गाझामध्ये हिंसाचार पुन्हा सुरू झाल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्धविरामासाठी ते कतारला जात असल्याचेही मॅक्रॉन यांनी सांगितले. इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्धविराम शुक्रवारी संपला, त्यानंतर पुन्हा हिंसाचार सुरू झाला.Efforts to establish a ceasefire between Israel and Hamas intensify French President leaves for Qatar



    COP28 परिषदेत सहभागी होण्यासाठी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन दुबईला पोहोचले होते. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी इस्रायल आणि हमास यांच्यात पुन्हा युद्धविरामासाठी प्रयत्न सुरू करण्याबाबत सांगितले. मॅक्रॉन म्हणाले की, ‘आम्ही अशा परिस्थितीत आलो आहोत जेव्हा इस्रायली सरकारने अत्यंत अचूकतेने आपली उद्दिष्टे निश्चित करणे आवश्यक आहे. हमासला पूर्णपणे नष्ट करू शकता येईल का? असे झाल्यास, यास 10 वर्षे लागू शकतात.

    इस्त्रायल-हमास युद्धात अमेरिकेची एन्ट्री; सीरियात इराण समर्थित दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर जोरदार ‘एयर स्ट्राइक’

    मॅक्रॉन म्हणाले की, पॅलेस्टिनी लोकांच्या जीवावर इस्रायलमध्ये शांतता नांदू शकत नाही. याबाबत स्पष्ट बोलण्याची गरज आहे. फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांच्या वक्तव्यावर इस्रायलच्या पंतप्रधानांचे सल्लागार मार्क रेगेव्ह म्हणाले की, ‘इस्रायललाही गाझामध्ये लढाई झाल्यास गोळीबारामुळे नागरिकांचा मृत्यू व्हावा, असे वाटत नाही. निष्पाप नागरिकांची कत्तल करणाऱ्या हमासला इस्रायल लक्ष्य करत आहे. गाझामधील नागरिकांचे रक्षण करण्यासाठी इस्रायल सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

    Efforts to establish a ceasefire between Israel and Hamas intensify French President leaves for Qatar

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या