चीनच्या युनान प्रांतातील यांग्बी यी स्वायत्त काऊंटी भूकंपाच्या धक्याने हादरली आहे. एकापाठोपाठ एक आलेल्या अनेक भूकंपांनी ३ जण ठार झाले तर २७ जण जखमी झाले.Earthquake shakes China, killing three
विशेष प्रतिनिधी
बीजिंग : चीनच्या युनान प्रांतातील यांग्बी यी स्वायत्त काऊंटी भूकंपाच्या धक्याने हादरली आहे. एकापाठोपाठ एक आलेल्या अनेक भूकंपांनी ३ जण ठार झाले तर २७ जण जखमी झाले.
चीनच्या सत्तारूढ कम्युनिस्ट पार्टी ऑ फ चायनाचे (सीपीसी) प्रांतप्रमुख यांग गुओजोंग यांनी सांगितले की, दाली बाइ स्वायत्त प्रांताच्या सर्व १२ काऊंटी व शहरांमध्ये भूकंपाचे हलके धक्के बसले. परंतु यांग्बीला सर्वाधिक धक्का बसला. तेथे २ जणांचा व योंगपिंग काऊंटीमध्ये एकाचा मृत्यू झाला.
सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआने सांगितले की, तीन जखमींची तब्येत गंभीर आहे. इतर किरकोळ जखमी आहेत. भूकंपामुळे २०,१९२ घरांचे नुकसान झाले आहे. ७२,३१७ पेक्षा जास्त नागरिकांवर त्यामुळे परिणाम झाला आहे.
चीन भूकंप नेटवर्क केंद्राने (सीईएनसी) दिलेल्या माहितीनुसार, यांग्बीमध्ये रात्री ९ ते ११ वाजेपर्यंत रिश्टर स्केलवर ५ पेक्षा अधिक तीव्रतेचे चार भूकंप आले. याच भागांत रात्री दोन वाजेपर्यंत भूकंपाचा १६६ धक्के बसले.
बचाव दलांना प्रभावित क्षेत्रात पाठविण्यात आले असून, बचाव मोहिमेला वेग दिला आहे. वायव्य चीनच्या किंगघई प्रांतात शनिवारी ७.४ तीव्रतेचा भूकंप झाला. परंतु यात कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.
शुक्रवारी रात्री दोन वाजून चार मिनिटांनी प्रांतातील गोलोग तिबेट स्वायत्त प्रांताच्या मादुओ काऊंटीमध्ये भूकंप झाला. मादुआपासून ३८५ किलोमीटर अंतरावरील प्रांतीय राजधानी शहर शिनिंगच्या रहिवाशांनाही भूकंपाचे धक्के बसले.
स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की, येथे घर कोसळल्याची किंवा कोणी जखमी झाल्याचे वृत्त नाही. तथापि, भूकंप प्रभावित भागातील महामार्गाचा काही भाग व अनेक पुलांचे नुकसान झाले.
Earthquake shakes China, killing three
महत्वाच्या बातम्या
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बदनामीचा कट, न्यूयॉर्क टाईम्सचे बनावट पान तयार करून सोशल मीडियावर केले व्हायरल
- जूनपर्यंत लस उपलब्धतेची परिस्थिती सुधारणार, देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
- केंद्राकडे मदतीचे रडगाणे गात बसण्यापेक्षा कबुल करा आमची क्षमता नाही, राज्य सरकार बरखास्त करा, नितेश राणे यांची मुख्यमंत्र्यांवर टीका
- पुणे जिल्हा ऍक्टिव्ह रुग्णांचा मोठा हॉटस्पॉट ; शुक्रवार अखेर ५८ हजार ८४० जण आढळले
- अंदमानात वर्षातील पहिला पाऊस बरसला ; मॉन्सून वारे दाखल ; केरळकडे वाटचाल सुरु