• Download App
    ब्रिटनच्या निर्वासितांच्या छावण्यांत राहूनही रोज 10 हजार कमाई; भोजन-निवास, उपचार मोफत; आठवड्याला 6 हजार भत्ता|Earning 10 thousand per day despite living in British refugee camps; Food and lodging, treatment free; 6 thousand allowance per week

    ब्रिटनच्या निर्वासितांच्या छावण्यांत राहूनही रोज 10 हजार कमाई; भोजन-निवास, उपचार मोफत; आठवड्याला 6 हजार भत्ता

    वृत्तसंस्था

    लंडन : ब्रिटनच्या निर्वासितांच्या छावण्यांमध्ये तीन वर्षे आश्रयाला राहण्याची मुभा आहे. या काळात अर्ज मंजूर झाल्यास ब्रिटनमध्ये राहण्याचा अधिकार मिळतो. फेटाळल्यास बेकायदा नागरिकास मूळ देशात परत पाठवले जाते. केंद्रातून रोजगारास जाण्यासाठी पाच दिवसांचे वर्क परमिट दिले जाते. अशा लोकांना दररोज आठ तासांचे वर्क परमिट मिळते. परमिटचे वेळापत्रक शिफ्टवर आधारित अशा स्वरूपाचे असते.Earning 10 thousand per day despite living in British refugee camps; Food and lodging, treatment free; 6 thousand allowance per week



    ब्रिटनमध्ये बेकायदा पद्धतीने आलेल्या सुमारे पाच हजार भारतीयांवर आफ्रिकन देश रवांडाला पाठवण्याची टांगती तलवार आहे. परंतु हे भारतीय ‘बेकायदा निर्वासित’ लेबल असूनही ब्रिटन सोडू इच्छित नाहीत. कारण भारतीय निर्वासितांचे येथे जगणे अतिशय सुकर झाले आहे. इंग्लिश खाडी पार करून ब्रिटनमध्ये घुसखोरी करताना पकडलेल्या भारतीयांची रवानगी निर्वासित छावणीत केली जाते. त्यानंतर एनजीआे या लोकांच्या पात्रतेनुसार त्यांना काम देते. केअर गिव्हर्स, नर्सिंग सहायकसारखी कामे भारतीय निर्वासितांना दररोज सरासरी दहा हजारांवर उत्पन्न मिळवून देतात. त्याशिवाय इतर रोजगार उदाहरणार्थ- गॅरेज काम, हॉटेल-रेस्तराँ व सेल्समनची कामे करूनदेखील या लोकांना सहजपणे ५ हजार मिळतात. लंडनमध्ये गॅटविक विमानतळाजवळ सात छावण्या आहेत. येथे पाच हजार भारतीयांसह एकूण ३० हजार निर्वासित राहतात. मोफत राहणे, भोजन, मेडिकल आणि आठवड्याला ६ हजार भत्तादेखील दिला जातो.

    ‘रवांडामध्ये उपासमार शक्य, तेथे बेरोजगारी….काम नाही’

    असेक्स येथील केंद्रात आश्रयास असलेला भारतीय म्हणाला, रवांडामध्ये आमची उपासमार होईल. तेथील छावण्यात आम्हाला कोणीही बसून खाऊ घालणार नाही. आम्ही ब्रिटनमध्ये काम करून पैसे कमावतो. रवांडामध्ये आधीच तरूणांची बेरोजगारी २० टक्क्यांहून जास्त आहे. म्हणूनच तेथे आम्हाला रोजगार मिळणार नाही. एकदा रवांडा गेल्यानंतर ब्रिटनला परतण्याची संधी नाही, असा हा नवा कायदा आहे. ब्रिटनच्या सुप्रीम कोर्टानेही रवांडाला असुरक्षित म्हटले आहे.

    Earning 10 thousand per day despite living in British refugee camps; Food and lodging, treatment free; 6 thousand allowance per week

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या