विशेष प्रतिनिधी
टोकियो – जपानमध्येही ड्रोन तंत्रज्ञान विकासावर सध्या प्रचंड भर दिला जात आहे. त्यामुळेच अनेक जपानी लोक ‘ड्रोन पायलट’ होण्यासाठी खासगी शिकवण्या करत आहेत.
सुरुवातीच्या काळात केवळ खेळणे म्हणून आणि लष्करी वापरासाठी म्हणून ड्रोनकडे पाहिले जात होत. आता मात्र व्यवसायासाठीही त्याचा वापर वाढतो आहे. Drone market in Japan is growing fastly
भविष्यात या क्षेत्राची प्रचंड वाढ होण्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला आहे. जपानमधील ड्रोन मार्केटमधील उलाढाल २०१८ ला १४ अब्ज डॉलर इतकी होती, ती २०२४ पर्यंत ४३ अब्ज डॉलरपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. जपानही ड्रोनची जगातील मोठ्या बाजारपेठांपैकी एक असून आशियात तिचा दुसरा क्रमांक आहे. टेराड्रोन, एसीएसएल आणि प्रोड्रोन सारख्या प्रसिद्ध कंपन्या जपानमध्येच आहेत.
जपानमधील मालमत्ता कायद्याप्रमाणे, एखाद्या जमीन अथवा घराच्या वरील ३०० मीटर उंचीपर्यंतच्या अवकाशावरही त्या जमीन मालकाचा हक्क असतो. सर्वसाधारणपणे ड्रोन हे १५० मीटर उंचीवरून उडतात. त्यामुळे असे ड्रोन घराच्या हवाई हद्दीतून गेल्यास त्याला आक्षेप घेतला जाऊ शकतो. त्यामुळेच जपानमध्ये आता हवाई हद्दही भाड्याने दिली जात आहे.
काही कंपन्यांनी तर टपाल कार्यालये, शॉपिंग सेंटर, रुग्णालये आणि महत्त्वाच्या गावांपासून निघणारे आपले ‘एअर कॉरिडॉर’ विकसीत केले आहेत. एखाद्या जागेवरून पुढे जाण्यासाठी ड्रोनला किती वेळ लागतो, त्यावर दर ठरलेले असतात. प्रत्येक तीन सेकंदांनुसार पैसे द्यावे लागतात. अशा प्रकारच्या सेवेचा आणखी विकास झाल्यास ड्रोनमुळे आकाश भरून जाईल आणि घरमालकांवर ‘आकाशातून पैशाचा पाऊस’ पडेल.’
Drone market in Japan is growing fastly
महत्त्वाच्या बातम्या
- सीएम शिवराज सिंह चौहान यांचा राहुल गांधींवर निशाणा, म्हणाले- तुमच्या खोटे बोलण्यामुळे अनेकांनी घेतली नाही लस!
- Mann Ki Baat : टोकियो ओलिंपिक, मिल्खा सिंग आणि कोरोना लसीकरण, वाचा पीएम मोदी देशवासियांना काय म्हणाले!
- उद्धव ठाकरेंना मराठा आंदोलन म्हणजे आदळआपट वाटते, ते टाइमपास करत आहेत, दरेकरांची टीका