• Download App
    सौदी अरेबियाच्या यान्बू बंदराजवळ ड्रोन बोटीद्वारे हल्ला, आखातात पुन्हा वाद सुरु|Drone attack on Saudi port

    सौदी अरेबियाच्या यान्बू बंदराजवळ ड्रोन बोटीद्वारे हल्ला, आखातात पुन्हा वाद सुरु

    विशेष प्रतिनिधी

    रियाध : सौदी अरेबियाच्या यान्बू बंदराजवळ स्फोटकांनी भरलेल्या बोटीचा स्फोट घडवून हल्ला करण्यात आला. लाल समुद्रातील या बंदराजवळ पोहोचण्याआधीच या बोटीला नष्ट करण्यातDrone attack on Saudi port

    आल्याचा दावा सौदी अरेबियाने केला असला तरी या घटनेमुळे यामुळे बंदरातील वाहतूक काही काळ ठप्प झाल्याचे सूत्रांनी सांगितले.रिमोट कंट्रोलच्या साह्याने ही बोट बंदराच्या दिशेने सोडण्यात आली होती.



    येमेनमधील हौथी बंडखोरांविरोधात सौदी अरेबियाची मोहिम सुरु असून या बंडखोरांना इराणचे पाठबळ असल्याचा सौदीचा आरोप आहे. हौथी बंडखोरांनी याआधी अनेक वेळा सौदीवर ड्रोनच्या साह्याने हल्ला केला असल्याने आजचा हल्लाही त्यांनीच केला असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

    या हल्ल्याची जबाबदारी अद्यापही कोणत्या संघटनेने अथवा देशाने घेतलेली नाही. मात्र, यामुळे आखाती देशांमध्ये असलेला वाद पुन्हा एकदा समोर आला असून या वादामध्ये इस्राईल आणि इराण यांच्या वादाचीही जोड आहे.

    Drone attack on Saudi port

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Trump : ट्रम्प म्हणाले- भारत आमच्या वस्तूंवर कर लावणार नाही; मी एक पत्र पाठवेन आणि इंडोनेशियासारखा करार होईल

    Imran Khan : इम्रान म्हणाले- मला काही झाल्यास मुनीर जबाबदार; सुटकेसाठी 5 ऑगस्टपासून देशभर निदर्शने

    Gaza Food Center : गाझात फूड सेंटरमध्ये चेंगराचेंगरी, 43 ठार; जमावाने 15 जणांना चिरडले; इस्रायली सैन्यावर नरसंहाराचा आरोप