• Download App
    पाकिस्तानचा GDP घसरला, गाढवं मात्र वाढली; अर्थमंत्री औरंगजेबाने सादर केलेल्या आर्थिक सर्वेक्षणातली माहिती!! Donkey population in Pakistan increased, GDP decreased

    पाकिस्तानचा GDP घसरला, गाढवं मात्र वाढली; अर्थमंत्री औरंगजेबाने सादर केलेल्या आर्थिक सर्वेक्षणातली माहिती!!

    वृत्तसंस्था

    इस्लामाबाद : दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानची आर्थिक हालत खस्ता आहे. तो देश गेली कित्येक वर्षे आर्थिक खाईतून जात आहे. उत्पादनापासून सेवांपर्यंत सगळी क्षेत्रे डबघाईला आली आहेत. पाकिस्तानचे देशांतर्गत सकल उत्पन्न अर्थात GDP घसरला आहे, पण इंटरेस्टिंग बाब अशी की पाकिस्तान मध्ये गाढवांच्या संख्येत वाढ झाली आहे. Donkey population in Pakistan increased, GDP decreased…!!

    पाकिस्तानी अर्थमंत्री मोहम्मद औरंगजेब यांनी सादर केलेल्या पाकिस्तानच्या 2023 – 24 च्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात ही अजब बाब समोर आली आहे. या अहवालात वेगवगळ्या क्षेत्रांसंबधीची आकडेवारी जाहीर केली असली तरी त्यामध्ये गाढवांची वाढलेली संख्या आवर्जून नमूद केली आहे. गेल्या वर्षभरात पाकिस्तानमधील गाढवांची संख्या 1 लाखाने वाढली आहे. पाकिस्तानमध्ये सध्या ५९ लाख गाढवे असल्याचे या अहवालात नमूद केले आहे.

    या सर्वेक्षणानुसार पाकिस्तानमधील गाढवांची संख्या वाढली आहे, मात्र देशाचा जीडीपी (सकल देशांतर्गत उत्पादन) वाढलेला नाही. जीडीपीबाबत सरकारने ठेवलेलं उद्दीष्ट तिथल्या सरकारला साध्य करता आलेलं नाही.

    सर्वाधिक गाढवं असलेल्या देशांच्या यादीत पाकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तान सध्या गाढवं चीन आणि उत्तर कोरिया यांना निर्यात करून पैसे कमवण्याच्या विचारात आहे, असे बिझनेस टूडेने बातमीत नमूद केले आहे.

    2020 – 21 मध्ये पाकिस्तानमधील गाढवांची संख्या 55 लाखांच्या आसपास होती, 2021 – 22 मध्ये ती 56 लाख, 22 – 23 मध्ये 57 लाख, 23 – 24 मध्ये 58 झाली होती. यंदा ही संख्या वाढून 59 लाखांच्या पुढे गेली आहे. पशुपालन हा पाकिस्तानमधील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मूळ आधार आहे. पाकिस्तानमधील खेड्यांमध्ये राहणारी 80 लाखांहून अधिक कुटुंबं पशुपालनाचा व्यवसाय करतात.

    Donkey population in Pakistan increased, GDP decreased…!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या