वृत्तसंस्था
नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेश येथील तवांमध्ये चिनी सैनिकांनी केलेल्या घुसखोरीच्या प्रयत्नांना भारतीय सैनिकांनी उधळून लावले. मात्र याबाबत प्रसार माध्यमांमधून वेगवेगळे दावे करण्यात येत आहेत. यासंदर्भात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज संसदेत निवेदन देणार आहेत. Different claims regarding India-China Tawang conflict
भारतीय सैन्यदल प्रमुख जनरल मनोज पांडे यांनी राजनाथ सिंह यांची भेट घेऊन तवांग मधील भारत – चीन संघर्षाची अधिकृत माहिती त्यांना दिली आहे. या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाले असून अनेक पक्षाच्या खासदारांनी स्थगन प्रस्तावाच्या नोटिसा संसदेत दिल्या आहेत. राजनाथ सिंह यासंदर्भात स्पष्ट खुलासा संसदेत करणार आहेत.
– वेगवेगळे दावे
मात्र चीनने तवांगमध्ये घुसखोरी करण्यासंदर्भात प्रसार माध्यमांमध्ये वेगवेगळे दावे करण्यात आले आहेत. काही प्रसार माध्यमांच्या मते तवांगमध्ये 300 सैनिकांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला, तर काही प्रसार माध्यमांनी 600 सैनिक घुसखोरी करायला आले होते, असा दावा केला आहे. परंतु भारतीय सैनिकांनी चिनी सैनिकांची ही घुसखोरी नुसती रोखलीच नाही तर त्यांना सडेतोड प्रत्युत्तर देऊन त्यांना तिथून हाकलून लावले आहे, असे प्रत्येक बातमीत म्हटले आहे. तवांग मधल्या संघर्षात 6 भारतीय सैनिक जखमी झाले. परंतु, भारतीय सैनिकांनी अनेक चिनी सैनिकांची हाडे मोडली. या संघर्षात भारतीय सैन्याचे जेवढे नुकसान झाले, त्यापेक्षा कितीतरी पट जास्त नुकसान चिनी सैनिकांचे झाले, असे प्रसार माध्यमांनी बातम्यांमध्ये नमूद केले आहे.
Different claims regarding India-China Tawang conflict
महत्वाच्या बातम्या