• Download App
    दक्षिण अफ्रिकेतील गावात सापडले हिरे! संपूर्ण देशातून लोक येऊ लागले|Diamonds found in a village in South Africa! People started coming from all over the country

    दक्षिण अफ्रिकेतील गावात सापडले हिरे! संपूर्ण देशातून लोक येऊ लागले

    अमेरिकन चित्रपटांतील कथेप्रमाणे दक्षिण अफ्रिकेतील एका गावात  काही विशिष्ट दगड सापडल्यानंतर हिरे सापडल्याची अफवा पसरली आहे. त्यामुळे संपूर्ण देशातून मोठ्या संख्येने लोक या गावात येत असून गोल्ड रशप्रमाणेच डायमंड रश सुरू झाला आहे. Diamonds found in a village in South Africa! People started coming from all over the country


    विशेष प्रतिनिधी

    केपटाउन : अमेरिकन चित्रपटांतील कथेप्रमाणे दक्षिण अफ्रिकेतील एका गावात  काही विशिष्ट दगड सापडल्यानंतर हिरे सापडल्याची अफवा पसरली आहे. त्यामुळे संपूर्ण देशातून मोठ्या संख्येने लोक या गावात येत असून गोल्ड रशप्रमाणेच डायमंड रश सुरू झाला आहे.

    दक्षिण आफ्रिकेतील क्वा-झुलु-नटाल भागात शेकडो लोकं हिरे शोधण्यासाठी खोदकाम करत आहेत. या भागात सापडणा-या विशिष्ट प्रकराच्या दगडांसाठी ही धडपड सुरु आहे. हे दगड हिरे असल्याचं मेंडो सबेलो नावाच्या एकाने सांगितले. त्यानंतर  ही डायमंड रश सुरु झाली आहे.  मिळेल त्या साधनाने नागरिक इथे खोदकाम करुन हे दगड घेऊन जात आहेत.

    देशातील खनिज संसाधन विभागाने असे म्हटले आहे की, भूगर्भशास्त्र आणि उत्खनन तज्ञांचे एक पथक येथे पाठवले जाईल जे नमुने गोळा करतील आणि त्याचे विश्लेषण करतील. यासंदर्भात औपचारिक अहवाल सादर केला जाईल.

    हे दगड प्रत्यक्षात हिरे आहेत की नाही हे अद्याप माहित नसले तरी लोक खोदण्यात व्यस्त आहेत. बऱ्याच लोकांनी त्यांची विक्री सुरू केली आहे. प्रांतीय सरकारने लोकांना ही जागा रिकामी करण्यास सांगितले आहे, जेणेकरून योग्य तपासणी करता येईल.

    इतक्या मोठ्या संख्येने लोकं जमा झाल्यामुळे कोरोचा प्रसार होण्याचा धोका देखील आहे. कोरोनामुळे दक्षिण आफ्रिकेच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला आहे.

    Diamonds found in a village in South Africa! People started coming from all over the country

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या