• Download App
    नमाजाच्या वेळी भजन म्हटल्याचा आरोप करत बांग्ला देशात मंदिराची तोडफोड|Demolition of a temple in Bangladesh for allegedly chanting hymns during prayers

    नमाजाच्या वेळी भजन म्हटल्याचा आरोप करत बांग्ला देशात मंदिराची तोडफोड

    विशेष प्रतिनिधी

    ढाका: नमाज सुरू असताना भजन म्हटल्याचा आरोप करत बांग्ला देशातील खुलना जिल्ह्यातील गौरा गावात धर्मांध कट्टरतावाद्यांनी हिंदू मंदिरांवर हल्ला करत तोडफोड केली. मंदिरांतील देवतांच्या मूर्त्यांचेही नुकसान केले. या प्रकरणी पोलिसांनी शनिवारी १० जणांना अटक केली आहे.Demolition of a temple in Bangladesh for allegedly chanting hymns during prayers

    शनिवारी सायंकाळी पाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान हा हल्ला झाला. शियाली, मलिकपुरा आणि गोवरा गावात शेकडो कट्टरतावादी, धर्मांध एकत्र आले त्यांनी मंदिर व हिंदू घरांवर हल्ले केले. या हल्यात सहा मंदिराची नासधूस झाली. ५७ हून अधिक हिंदू कुटुंबावर हल्ला झाला. काही घरांना आग लावण्यात आली. घरे, दुकानांची लूट करण्यात आली.



    पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा छापेमारीत या हल्ल्यातील १० संशयितांना अटक काही स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी रात्री वाद झाला. नमाजाच्या वेळी सुरू असलेल्या भजनाच्या मुद्यावरून हा वाद झाल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले. या वादाला शनिवारी हिंसक वळण लागले.

    Demolition of a temple in Bangladesh for allegedly chanting hymns during prayers

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    China : चीनने म्हटले- अमेरिकेने जपानमधून टायफून क्षेपणास्त्र प्रणाली काढावी; यामुळे प्रदेशाच्या सुरक्षेला धोका

    Trump : ब्रिटनच्या शाही राजवाड्यात ट्रम्प यांचे भव्य स्वागत; किंग चार्ल्ससोबत सोन्याच्या बग्गीतून प्रवास

    Nepal : नेपाळमध्ये 6 पक्षांच्या प्रमुख नेत्यांना हटवण्याची मागणी; जेनझी आंदोलकांनी म्हटले- जुने चेहरे सहन करणार नाही