विशेष प्रतिनिधी
न्यूयॉर्क – म्यानमारमधील अंतर्गत संघर्षाने भीषण रुप धारण करण्याआधीच आणि त्याचा परिणाम इतरांवर होण्याआधीच आंतरराष्ट्रीय समुदायाने एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस यांनी केले.Democracy sould be restore in Mynmar
म्यानमारमधील परिस्थितीबाबतचा अहवाल संयुक्त राष्ट्रांनी प्रसिद्ध केला असून त्यामध्ये गुटेरेस यांनी इतर देशांना आवाहन केले आहे. ‘म्यानमारमधील लष्कराला त्यांचे बस्तान बसविण्यापासून रोखण्याची संधी दिवसेंदिवस हातातून निसटत जात आहे.
म्यानमारला पुन्हा लोकशाहीच्या मार्गावर आणण्यासाठी प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय समुदायाने तातडीने प्रयत्न करणे गरजेचे आहे,’ असे गुटेरेस यांनी अहवालात म्हटले आहे.
म्यानमारमध्ये यावर्षी एक फेब्रुवारीला लष्कराने बंड करत लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारच्या हातून सत्ता हिसकावून घेतली होती.
या लष्करशाहीविरोधात अद्यापही म्यानमारमध्ये जनतेचे आंदोलन सुरु आहे. सैनिकांबरोबर झालेल्या संघर्षात आतापर्यंत ११०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. म्यानमारमधील संघर्षावर तोडगा काढण्यासाठी ‘आसियान’ देशांनी काही शिफारसी केल्या आहेत. तसेच, ब्रुनेईचे परराष्ट्र मंत्री एरिवन युसुफ यांची ‘आसियान’चे विशेष दूत म्हणूनही नियुक्ती केली आहे.
Democracy sould be restore in Mynmar
महत्त्वाच्या बातम्या
- Aryan Khan Drugs Case : शाहरुख खानच्या समर्थनार्थ आले शशी थरूर, आर्यनबद्दल म्हणाले – सहानुभूती ठेवा!
- माजी कर्मचाऱ्याचा फेसबुकवर मोठा आरोप, पैशांसाठी हेट स्पीचला चालना देते ही दिग्गज सोशल मीडिया कंपनी
- नवरात्रोत्सव २०२१ : रावणदहनाला प्रेक्षक बोलवू नका, लोकांना लाइव्ह पाहण्याची व्यवस्था करा, वाचा… गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना
- Pandora Papers Leak : सरकारने दिले चौकशीचे आदेश; आरबीआय, सीबीडीटी आणि ईडी अधिकाऱ्यांकडून संयुक्त तपास होणार