• Download App
    Deadly plane crash in Brazil ब्राझीलमध्ये विमानाचा भीषण अपघात,

    city of Vinhedo : ब्राझीलमध्ये विमानाचा भीषण अपघात, 61 ठार; साओ पाउलोच्या विन्हेदो शहरातील घटना

    Sao Paulo

    वृत्तसंस्था

    रिओ दी जानेरिओ : ब्राझीलमधील साओ पाउलो  ( Sao Paulo )राज्यातील विन्हेदो शहरात 61 जणांना घेऊन जाणारे विमान कोसळले. बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार, सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. एअरलाइन व्होईपासने यापूर्वी सांगितले होते की विमानात 62 लोक होते.

    व्होईपास एअरलाइन्सने सांगितले की, साओ पाउलोच्या आंतरराष्ट्रीय विमानतळ ग्वारुलहोसला जाणारे विमान क्रॅश झाले. त्यात 57 प्रवासी आणि 4 क्रू मेंबर्स होते. हा अपघात कसा झाला हे कळू शकलेले नाही.

    क्रॅश झालेल्या विमानाची नोंदणी PS-VPB, ATR 72-500 आहे. यात एकूण 74 लोक बसू शकतात. मात्र, अपघाताच्या वेळी विमानात 62 जण होते, असा दावा अहवालात करण्यात आला आहे.



    विमान एका मिनिटात 17 हजार फूट खाली पडले

    सीएनएनच्या वृत्तानुसार, फ्लाइट ट्रॅकिंग डेटावरून असे दिसून आले की विमानाने अपघाताच्या दीड मिनिट आधी उंची गमावली होती. स्थानिक वेळेनुसार दुपारी 1:21 पर्यंत विमान 17 हजार फूट उंचीवर उडत होते. यानंतर अवघ्या 10 सेकंदात ते सुमारे 250 फूट खाली आले.

    पुढच्या आठ सेकंदात ते सुमारे 400 फूट वर गेले. 8 सेकंदानंतर ते 2 हजार फूट खाली पोहोचले. मग, लगेच ते वेगाने खाली येऊ लागले. ते अवघ्या एका मिनिटात अंदाजे 17 हजार फूट खाली पडले आणि आग लागली.

    निवासी भागात पडले, अनेक घरांना धडक दिली

    सीएनएन ब्राझीलच्या रिपोर्टनुसार, नागरी सुरक्षा विभागाने म्हटले आहे की, विमान निवासी भागात पडले, परंतु त्यामुळे जमिनीवर कोणतीही जीवितहानी झाली नाही. एका निवासी घराचे नुकसान झाले आहे. हे विमान कॅस्केवेलहून निघाले होते आणि ते साओ पाउलोला जात होते. ब्राझीलच्या वेळेनुसार दुपारी दीड वाजता त्याचे सिग्नल गायब झाले.

    हा अपघात कसा झाला याबाबत अद्याप पुष्टी झालेली नाही, असे एअरलाइन व्हॉयपासने सांगितले. मात्र, विन्हेदोजवळील व्हॅलिनहोस प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार या अपघातात कोणीही वाचले नाही. जवळच्या कॉन्डोमिनियम कॉम्प्लेक्समधील फक्त एका घराचे नुकसान झाले, परंतु कोणतेही रहिवासी जखमी झाले नाहीत.

    अग्निशमन दलाची 7 पथके तैनात

    विमान अपघातातील जखमींना वाचवण्यासाठी लष्करी पोलिसांसह 7 पथके तैनात करण्यात आली होती. सरकारी निवेदनानुसार, लीगल मेडिकल इन्स्टिट्यूट (IML) ची टीम आणि मृतदेह गोळा करण्यासाठी जबाबदार असलेले लोकही घटनास्थळी पाठवण्यात आले आहेत. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला दा सिल्वा यांनी या दुर्घटनेनंतर मृतांच्या कुटुंबियांप्रति शोक व्यक्त केला आहे.

    Deadly plane crash in Brazil, 61 dead; Events in the city of Vinhedo, Sao Paulo

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    American Pope : नवीन पोपची घोषणा झाली, रॉबर्ट प्रीव्होस्ट सर्वात मोठे ख्रिश्चन धर्मगुरू, पहिले अमेरिकी पोप

    Pakistan PM : ऑपरेशन सिंदूरनंतर पाक पंतप्रधानांचा जळफळाट- आम्ही बदला घेऊ; संसदेत 5 भारतीय विमाने पाडल्याचा दावा

    Donald Trump : ट्रम्प यांनी UNची 19 हजार कोटींची मदत रोखली; 3000 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची योजना