• Download App
    Cuttack Shut Down Due to Communal Tension: Curfew in 13 Police Stations After Violence in Durga Immersion Procession ओडिशाच्या कटकमध्ये हिंसाचारामुळे मोठा तणाव

    Cuttack : ओडिशाच्या कटकमध्ये हिंसाचारामुळे मोठा तणाव; प्रतिबंधात्मक आदेश लागू, विहिंप रॅलीत हिंस, 25 जखमी

    Cuttack

    वृत्तसंस्था

    कटक : Cuttack  दसरा मिरवणुकीदरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर ओडिशातील कटक शहर सोमवारी बंद होते. त्यामुळे जातीय तणाव निर्माण झाला. प्रशासनाने १३ पोलिस ठाण्यांच्या परिसरात संचारबंदी लागू केली आणि इंटरनेट सेवा बंद केल्या.Cuttack

    रविवारी दुर्गा मूर्ती विसर्जन मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर ही कारवाई केली, ज्यामध्ये आठ पोलिसांसह २५ जण जखमी झाले. पोलिस आयुक्त एस. देवदत्त सिंह यांनी सांगितले की, दर्गा बाजार, मंगलाबाग आणि छावणीसह १३ पोलिस ठाण्यांच्या परिसरात संचारबंदी लागू आहे.Cuttack



    जिल्हा प्रशासनाच्या आदेशांचे उल्लंघन करून रविवारी संध्याकाळी विहिंपने मोटारसायकल रॅली आयोजित केल्यानंतर हिंसाचाराची ही ताजी घटना घडली. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना पुढे जाण्यापासून रोखल्याने सहभागी हिंसक झाले. रॅलीदरम्यान प्रक्षोभक घोषणाबाजी देखील करण्यात आली.

    ६ आरोपींना अटक, इतरांची ओळख पटवली जातेय

    मूर्ती विसर्जन समारंभात झालेल्या हिंसाचार प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. सीसीटीव्ही फुटेज, ड्रोन फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबाच्या आधारे इतरांची ओळख पटवली जात आहे.

    Cuttack Shut Down Due to Communal Tension: Curfew in 13 Police Stations After Violence in Durga Immersion Procession

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Iran : इराण चलनातून 0000 काढून टाकणार, 10000 आता 1 रियाल; महागाईमुळे उचलले पाऊल

    Nepal : नेपाळमध्ये भूस्खलनामुळे दोन दिवसांत 51 जणांचा मृत्यू; 9 जण बेपत्ता; लष्कराच्या हेलिकॉप्टरने बचावकार्य सुरू

    US Government : अमेरिकेच्या अण्वस्त्रांवरही शटडाऊनचा परिणाम; ऊर्जा सचिव म्हणतात- सुरक्षा निधी 8 दिवसांपासून प्रलंबित