cristiano ronaldo : पोर्तुगीज सुपरस्टार फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलो केला जाणारा सेलिब्रिटी आहे. इन्स्टावर त्याचे 300 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. इन्स्टावर 300 मिलियन फॉलोअर्स असणारा तो जगातील पहिला सेलिब्रिटी ठरला आहे. रोनाल्डोच्या नावावर इतरही अनेक कामगिरी आहेत. इन्स्टावर 200 मिलियनचा टप्पा पार करणाराही तोच पहिला स्टार होता. cristiano ronaldo Became First Celebrity To cross 300 million instagram followers milestone
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पोर्तुगीज सुपरस्टार फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलो केला जाणारा सेलिब्रिटी आहे. इन्स्टावर त्याचे 300 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. इन्स्टावर 300 मिलियन फॉलोअर्स असणारा तो जगातील पहिला सेलिब्रिटी ठरला आहे. रोनाल्डोच्या नावावर इतरही अनेक कामगिरी आहेत. इन्स्टावर 200 मिलियनचा टप्पा पार करणाराही तोच पहिला स्टार होता.
इंस्टाग्रामवर 300 दशलक्ष फॉलोअर्स मिळवणारा पहिला व्यक्ती रोनाल्डो दुसर्या क्रमांकावर असलेल्या ड्वेन ‘द रॉक’ जॉन्सनपेक्षा खूप पुढे आहे. इन्स्टावर ड्वेनचे 246 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.
कोका कोलामुळे रोनाल्डो चर्चेत
पोर्तुगीज सुपरस्टार क्रिस्टियानो रोनाल्डोने युरोपियन चॅम्पियनशिपमध्ये पत्रकार परिषदेत टेबलवरून कोका-कोलाची बाटली काढून चर्चेत आला आहे. रोनाल्डो फिटनेसबाबत खूपच सजग आहे. त्याने पूर्वी कार्बोनेटेड पेयांमुळे होणारे प्रकृती अस्वास्थ्याबद्दलही सांगितले आहे. सोमवारी पोर्तुगालच्या हंगेरीविरुद्धच्या सलामीच्या सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत त्याने समोर ठेवलेल्या दोन कोका-कोला काचेच्या बाटल्या टेबलवरून हटवल्या. हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्याऐवजी त्याने पाण्याची बाटली सर्वांसमोर उंचावून धरली.
कोका-कोलाचे शेअर्स घसरले
मीडिया रिपोर्टनुसार, युरो 2020 च्या अधिकृत प्रायोजकांपैकी एक असलेल्या कोका-कोलाच्या शेअर्स किंमत हा व्हिडिओ व्हायरल हाताच 56.10 डॉलरवरून घसरून 55.22 डॉलरवर गेली. कोका-कोलाचे बाजार मूल्यांकनदेखील 242 अब्ज डॉलर्सवरून घटून 238 अब्ज डॉलर्सवर आले. या सर्व प्रकारात कंपनीला 4 अब्ज डॉलर्सचा फटका बसला आहे.
cristiano ronaldo Became First Celebrity To cross 300 million instagram followers milestone
महत्त्वाच्या बातम्या
- भुजबळ, पटोले, वडेट्टीवार हे तर ‘हेराफेरी’ सिनेमातील कलाकार; आशिष शेलारांची सडकून टीका
- जात प्रमाणपत्र हायकोर्टातून रद्द झाल्यानंतर नवनीत राणांची खासदारकी धोक्यात, सर्वोच्च न्यायालयात धाव
- फेब्रुवारी 2022 मध्ये राज्यातील 10 महापालिका, 20 नगर परिषदांच्या निवडणुकीची शक्यता
- बुलेट ट्रेनसाठी मुंबई-हैदराबाद व्हाया औरंगाबाद, नांदेड, जालना मार्ग प्रस्तावित करा; अशोक चव्हाणांचे मुख्यमंत्र्यांना पत्
- बीडमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांनी अडवला अजित पवारांचा ताफा, पोलिसांकडून महिला कर्मचाऱ्यांवरही लाठीमार