• Download App
    स्पेनमध्ये कोविड आणीबाणी समाप्त करताच नागरिकांनी केला नववर्षाप्रमाणे जल्लोष |Covid emergency lifted in spain

    स्पेनमध्ये कोविड आणीबाणी समाप्त करताच नागरिकांनी केला नववर्षाप्रमाणे जल्लोष

    विशेष प्रतिनिधी

    बार्सिलोना : युरोपमध्ये कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांत स्पेनचा समावेश आहे. सुमारे ७९ हजार मृत्यू आणि ३५ लाख रुग्ण अशी येथील आकडेवारी आहे.Covid emergency lifted in spain

    मात्र आता स्पेनने आणीबाणी उठविली आहे. त्यामुळे देशभर नागरिकांनी नववर्षाप्रमाणे जल्लोष केला. गेल्या ऑक्टोबरमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली होती.



    शनिवारी रात्री दहा वाजल्यापासून निर्बंध उठविण्यात आले असले तरी स्पेनमधील १७ प्रांतांच्या सरकारसमोर मोठे आव्हान असेल. आरोग्यसेवेची जबाबदारी त्यांच्यावर आहे.

    संसर्गाच्या तीव्रतेनुसार निर्बंध लागू करण्याचे अधिकारी प्रांतांना देण्यात आले आहेत.दरम्यान आणीबाणी उठवून गोंधळाची स्थिती निर्माण केल्याचा आरोप विरोधी पक्षांनी सरकारवर केला आहे.

    नाताळचा अपवाद वगळता इतक्या दिवसांत आंतरविभागीय प्रवासावर निर्बंध होते. ईस्टरच्यावेळी स्पेनमध्ये पर्यटनाचे प्रमाण सर्वाधिक असते, पण संसर्ग वाढण्याच्या भीतीने त्यास परवानगी नव्हती.

    परदेशी पर्यटकांना मात्र सरकारने प्रवेश दिला होता. ते देशात मोठ्या संख्येने गर्दी करीत असताना आणि सुट्टीचा आनंद लुटत असताना आपल्याला मात्र प्रवासास परवानगी नसल्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली होती.

    Covid emergency lifted in spain

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या