• Download App
    Cororna increased in France

    फ्रान्समध्ये दररोज आढळतायेत कोरोनाचे लाखांवर रुग्ण; देशभऱ चिंतेचे सावट

    विशेष प्रतिनिधी

    पॅरिस – फ्रान्समध्ये कोरोनाचा संसर्ग वाढल्याने सारा देश चिंतेत गेला आहे. देशात गेल्या २४ तासांत एक लाखांपेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे संसर्गाला रोखण्यासाठी कडक निर्बंध लागू केले असून किमान तीन आठवड्यापर्यंत या नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे.

    फ्रान्सचे पंतप्रधान जीन कॅस्टेक्स यांनी कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे नवीन नियमावली जारी केली आहे. यानुसार पुढील आठवड्यात फ्रान्समध्ये इनडोअर कार्यक्रमात २ हजार तर खुल्या मैदानावर होणाऱ्या कार्यक्रमात किंवा खेळात ५ हजार लोक सामील होऊ शकतील.



    तसेच कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकांना खाली बसण्याचे आवाहन केले जाईल आणि बारमध्ये देखील ग्राहकांना उभे राहण्याची परवानगी नसेल. सिनेमागृहे, स्पोर्ट्स सुविधा केंद्र आणि सार्वजनिक वाहतूकीदरम्यान खाणेपिण्यास मनाई करण्यात आली आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासात देखील वाटेत खाण्याची परवानगी नसेल.

    वर्क फ्रॉम होमला पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातील तीन दिवस घरातूनच काम करावे लागेल. फ्रान्समध्ये शनिवारी १ लाख ४६११ नवीन रुग्ण आढळले तर शुक्रवारी हीच संख्या ९४,१२४ एवढी होती. शनिवारी या संसर्गाने ८४ जणांचा मृत्यू झाला. सध्या फ्रान्समध्ये १६ हजार जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Trump : ट्रम्प यांच्या ब्रिटन दौऱ्याविरोधात निदर्शने; हजारो लोक रस्त्यावर उतरले

    Nepali Media : नेपाळी माध्यमांचा दावा- मारहाणीच्या भीतीने ओली यांचा राजीनामा; लष्कराने म्हटले- आधी राजीनामा, मगच पळून जाण्यासाठी हेलिकॉप्टर मिळेल

    China : चीनने म्हटले- अमेरिकेने जपानमधून टायफून क्षेपणास्त्र प्रणाली काढावी; यामुळे प्रदेशाच्या सुरक्षेला धोका