• Download App
    आज किंग चार्ल्स यांचा आज राज्याभिषेक, 70 वर्षांनंतर सोहळा, 12व्या शतकातील चमचा, पवित्र तेलाने अभिषेक; 1 हजार कोटींचा होणार खर्च|Coronation of King Charles today, ceremony 70 years later, 12th century spoon, anointed with holy oil; 1 thousand crores will be spent

    आज किंग चार्ल्स यांचा आज राज्याभिषेक, 70 वर्षांनंतर सोहळा, 12व्या शतकातील चमचा, पवित्र तेलाने अभिषेक; 1 हजार कोटींचा होणार खर्च

    वृत्तसंस्था

    लंडन : ब्रिटनचे राजे चार्ल्स तिसरे आणि राणी कॅमिला यांचा वेस्टमिन्स्टर अॅबे चर्चमध्ये शनिवारी दुपारी 3:30 वाजता (भारतीय वेळेनुसार) राज्याभिषेक होईल. ब्रिटनच्या राजघराण्यात 70 वर्षांनंतर हा सोहळा होणार आहे. यापूर्वी 1953 मध्ये राणी एलिझाबेथ यांचा राज्याभिषेक झाला होता. तेव्हा त्या 27 वर्षांच्या होत्या. त्यावेळी चार्ल्स 4 वर्षांचे होते.Coronation of King Charles today, ceremony 70 years later, 12th century spoon, anointed with holy oil; 1 thousand crores will be spent

    आता किंग चार्ल्स 74 वर्षांचे आहेत. खराब हवामानाचा इशारा असूनही, किंगच्या मोटारगाडीच्या मार्गावर गर्दी जमू लागली आहे. राज्याभिषेकादरम्यान किंग चार्ल्स 700 वर्षे जुन्या सँड एडवर्डच्या खुर्चीवर बसतील. त्यांच्या अभिषेकासाठी 12व्या शतकातील सोन्याचा चमचा आणि पवित्र तेल वापरले जाईल.



    गेल्या वर्षी 8 सप्टेंबर रोजी राणी एलिझाबेथ यांचे निधन झाले. तेव्हा त्या 96 वर्षांच्या होत्या. त्यांच्या मृत्यूनंतर चार्ल्स यांना ब्रिटनचा राजा म्हणून घोषित करण्यात आले. त्यांचा राज्याभिषेक आता होत आहे. एलिझाबेथ यांना त्यांचे वडील किंग अल्बर्ट यांच्या निधनानंतर राणी म्हणूनही घोषित करण्यात आले होते, परंतु सोळा महिन्यांनंतर जून 1953 मध्ये त्यांचा राज्याभिषेक करण्यात आला होता.

    राज्याभिषेकासाठी किंग चार्ल्स यांची मोटारगाडी सकाळी 10:20 वाजता (यूके वेळ) बकिंगहॅम पॅलेसमधून निघेल, सकाळी 11 वाजता वेस्टमिन्स्टर अॅबे येथे पोहोचेल.

    राज्याभिषेकावर 1 हजार कोटी रुपयांचा खर्च

    किंग चार्ल्स यांच्या राज्याभिषेकासाठी £100 दशलक्ष पौंड म्हणजेच सुमारे एक हजार कोटी रुपये खर्च आला आहे. हा पैसा ब्रिटनच्या करदात्यांच्या खिशातून घेण्यात आला आहे. यामध्ये शाही खजिन्याचा वापर करण्यात आलेला नाही. हे पाहता ब्रिटनमधील अनेक लोक राज्याभिषेक सोहळ्याला विरोध करत आहेत. द गार्डियनच्या रिपोर्टनुसार, किंग चार्ल्स यांची सँडरिंगहॅममध्ये 75 मिलियन पौंड म्हणजेच 771 कोटींची संपत्ती आहे.

    द गार्डियनच्या रिपोर्टनुसार, या सोहळ्यासाठी कोणतीही कायदेशीर आवश्यकता नाही. राणी एलिझाबेथच्या मृत्यूनंतर, जेव्हा चार्ल्स यांना राजा म्हणून घोषित करण्यात आले, तेव्हा ते अधिकृतपणे राजा झाले होते.

    Coronation of King Charles today, ceremony 70 years later, 12th century spoon, anointed with holy oil; 1 thousand crores will be spent

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Canada : कॅनडात मंदिराच्या भिंतीवर लिहिल्या खलिस्तानी घोषणा; नगर कीर्तनापूर्वी कारवाई

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार