वृत्तसंस्था
बेजिंग : चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाला असून आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. हाँगकाँगमध्ये खाटा शिल्लक नाहीत, अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
Corona eruption again in China; Health system collapses: Hong Kong has no beds
हाँगकाँगमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. झीरो कोविड धोरण लागू केले आहे. त्याचबरोबर रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढल्याने आता खाटा शिल्लक नसल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. बाधितांना रुग्णालयाबाहेर लॉन किंवा प्रतीक्षालयात ठेवले असून तेथेच उपचार सुरू आहेत. हाँगकाँगच्या सर्वात गरीब जिल्ह्यातील शाम शुई पोच्या कारिटास मेडिकल सेंटर येथे ४० हून जास्त वृद्ध उपचारासाठी रांगेत तिष्ठत होते. थंडीमुळे ज्येष्ठांचा त्रास वाढला आहे.
हाँगकाँगच्या लोकप्रिय निवेदकाविरुद्ध चीनकडून देशद्रोहाचा खटला दाखल
तात्पुरत्या निवाऱ्यातील आयसोलेशन कक्षात मुलांसह मोठ्यांनाही बसण्याची वेळ आली आहे. कारण वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे. बाधितांना रुग्णालयात दाखल करण्याचा हाँगकाँगमध्ये कडक नियम आहे. परंतु एक आठवड्यापासून दररोज दुप्पट संख्येने बाधित दाखल होत आहेत. बुधवारी ४ हजार २८५ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे.
Corona eruption again in China; Health system collapses: Hong Kong has no beds
महत्त्वाच्या बातम्या
- हिमालयातील योग्याच्या सल्ल्याने नावाने स्टॉक एक्सेंज चालविणाऱ्या चित्रा रामकृष्ण यांना अध्यक्षपदी नेमलेच कसे? निर्मला सीतारामन यांचा मनमोहन सिंग यांना सवाल
- शिवसेनेच्या मूकसंमतीने अखेर मालेगावातील उर्दू घराला “हिजाब गर्ल” मुस्कान खानचे नाव!!
- अंतराळात सर्वात मोठी रेडिओ आकाशगंगा सापडली
- राज्यातील चित्रपटगृहे, उपाहारगृहे पूर्ण क्षमतेने; दोन दिवसांत निर्बंध शिथिलची नवी नियमावली