• Download App
    जगभरातील कोरोना बाधितांची संख्या वीस कोटीपर्यंत पोहोचली, रुग्णसंख्येत पुन्हा वाढ|Corona cases rising in world once again

    जगभरातील कोरोना बाधितांची संख्या वीस कोटीपर्यंत पोहोचली, रुग्णसंख्येत पुन्हा वाढ

    विशेष प्रतिनिधी

    न्यूयॉर्क – जगभरातील कोरोना बाधितांची एकूण संख्या पुढील आठवड्यापर्यंत वीस कोटी पर्यंत पोहोचेल, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) दिला आहे. कोरोना विषाणूच्या डेल्टा या प्रकाराचा प्रभाव आता तब्बल १३५ देशांमध्ये दिसून येत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.Corona cases rising in world once again

    ‘डब्लूएचओ’ने कोरोना संसर्गस्थितीबाबतचा ताजा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार, भारतात सर्वप्रथम आढळलेल्या डेल्टाची नोंद आता १३५ देशांमध्ये झाली आहे. या देशांमध्ये डेल्टा विषाणूमुळे आजारी पडलेल्या अनेकांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. जागतिक पातळीवर कोरोनाबाधितांची संख्याही गेल्या महिनाभरापासून वाढत आहे. गेल्या आठवड्यात जगात ४० लाख नवे कोरोनाबाधित आढळले.



    प्रशांत महासागर प्रदेशातील देशांमध्ये संसर्गाचे प्रमाण वाढत असल्याने एकूण रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे ‘डब्लूएचओ’ने सांगितले आहे. आशियात रुग्णसंख्या वाढीचा वेग मंदावला आहे. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाणही आठ टक्क्यांनी कमी झाले आहे.

    कोरोना विषाणूची देशांमध्ये नोंद
    अल्फा : १८२
    गॅमा : ८१
    बिटा : १३२
    डेल्टा : १३५

    Corona cases rising in world once again

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या