• Download App
    कोरोना प्रतिबंधक लस घेऊ नका असा कंपनी प्रमुखाने सल्ला दिला अन् शेअर्स धाडधाड कोसळले|Company chief advises not to take corona vaccine and shares crashed

    कोरोना प्रतिबंधक लस घेऊ नका असा कंपनी प्रमुखाने सल्ला दिला अन् शेअर्स धाडधाड कोसळले

    विशेष प्रतिनिधी

    टोकियो : लस घेतल्यानंतर पाच वर्षांत मृत्यू होईल असा इशारा देत कर्मचाऱ्यांना लसीकरण करून घेऊ नका असा इशारा एका कंपनीच्या प्रमुखाने दिला. त्यामुळे कंपनीचे शेअर्स धाडधाड कोसळले आहेत. लसीकरणाबाबत चुकीच्या समजामुळे जपानमधील सर्वात मोठ्या गृहनिर्माण कंपनीला मोठा फटका बसला आहे.Company chief advises not to take corona vaccine and shares crashed

    टामा होम कंपनी ही जपानमधील सर्वात मोठी गृहनिर्माण कंपनी म्हणून ओळखली जाते. कंपनीचे अध्यक्ष शिनया टामाकी कोरोना प्रतिबंधक लसीच्या विरोधात आहेत. त्यांनी कर्मचाºयांना ई-मेलच्या माध्यमातून लसीकरणाविरोधात इशारा दिला आहे.



    लस घेतलेल्यांचा पाच वर्षांमध्ये मृत्यू होईल, असे त्यांचे म्हणणे आहे. याबाबत अज्ञात कर्मचाऱ्याचा हवाला देऊन जपानमधील एका साप्ताहिकात याबाबत वृत्त प्रकाशित झाले. लसींशिवाय ५ जी मोबाइलमुळे होणाऱ्या दुष्परिणामांचाही त्यांनी कर्मचाऱ्यांना इशारा दिला आहे.

    या प्रकारामुळे कंपनीचे शेअर्स १२ टक्क्यांनी कोसळले. गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावला. दररोजच्या तुलनेत १० पट जास्त संख्येने व्यवहार झाले. टामाकी यांनी २०१८ मध्ये कंपनीची सूत्रे हाती घेतल्यानंतर शेअर्सचे मूल्य दुप्पटीने वाढले आहे.

    कंपनीने मात्र कर्मचाऱ्यांवर दबाव टाकल्याचे फेटाळले आहे. लस घेण्याबाबतचा निर्णय हा संबंधित कर्मचाऱ्याचा आहे. सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेली माहिती चुकीची असल्याचे स्पष्टीकरण कंपनीने दिले आहे.गेल्या काही दिवसांपासून जपानमध्ये लसीकरणाची गती मंदावली आहे. लस न घेतलेल्या तरुणांची रुग्णसंख्या वाढत असल्याचे दिसत आहे.

    Company chief advises not to take corona vaccine and shares crashed

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Russian President Putin : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची युक्रेनला चर्चेची ऑफर; युरोपीय देशांच्या धमकीनंतर आला प्रस्ताव

    Shahbaz : PAK पंतप्रधानाचा खोटारडेपणा; शाहबाज म्हणाले- भारताकडून आधी युद्धबंदीचे उल्लंघन; रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढणार

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!