विशेष प्रतिनिधी
चायना : आपल्याला मनसोक्त आणि हवे ते, हवे तेवढे खायला मिळावे आणि आपलं वजन ही वाढू नये अशी प्रत्येकाची इच्छा असते. जंक फूड तर आजकाल प्रत्येकालाच आवडतं.
Chinese McDonald’s uses exercise bikes instead of tables
मॅक डीमध्ये जाणे, बर्गर पिझ्झा खाणे सगळ्यांनाच आवडते. पण जंक फूड खाल्ल्यामुळे आरोग्याच्या तक्रारी होतात. यासारख्या बऱ्याच गोष्टी आपण नेहमीच ऐकत असतो. आरोग्याची काळजी घेणाऱ्या लोकांनी तर ह्या मोठ्या मोठ्या मॅक्डोनाल्ड्स, डॉमिनोझ सारख्या ब्रँड्स वर कधीचा बहिष्कार टाकला आहे.
पण जर तुम्ही फास्ट फूड खातात आणि वजनही वाढणार नाही असं कोणी सांगितले तर? मज्जाच मज्जा मग.
चायनामध्ये मॅकडोनाल्ड्समध्ये एक नवीन प्रयोग मॅक्डोनाल्ड तर्फे चालू केला आहे. तिथे एक्झरसाइज करण्यासाठी बाइक्स वापरण्यात येतात. बसण्यासाठी टेबल ऐवजी या एक्झरसाइज बाईक्सचा वापर करताना लोक दिसून येत आहेत.
नुकताच एक हा व्हिडिओ चायनीज टिक टॉकवर व्हायरल झालेला आहे. त्यामुळे मॅकडोनाल्ड्सने जंक फूड वाईट असते हे वाक्य जास्त सिरियस घेतल्याचे दिसत आहे. तुम्हाला काय वाटते?
भारतीय मॅकडोनाल्ड्समध्ये असे टेबल्स असतील तर? तुम्हाला काय वाटतंय?
Chinese McDonald’s uses exercise bikes instead of tables
महत्त्वाच्या बातम्या
- अमेरिकेत विदाऊट ड्रायव्हरची गाडी, राज्यामध्ये लोकशाही विदाऊट मुख्यमंत्री; सुधीर मुनगंटीवार
- बेकायदेशीर सावकारीबाबत थेट पुणे पोलिसांना देऊ शकता माहिती ; जारी केला एक व्हॉट्सअप नंबर
- ओमिक्रॉनचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्राने महाराष्ट्राला दिल्या ८ महत्वाच्या सूचना ; वाचा सविस्तर
- … मुख्यमंत्रिपदाची धुरा रश्मी ठाकरे यांच्याकडे सोपवा; चंद्रकांत पाटलांची शिवसेनेला कोपरखळी