• Download App
    अमेरिकेत चीनचे छुप्या पद्धतीने बेकायदा पोलीस ठाणे; एफबीआयची धडक कारवाई, 2 जणांना अटक|China's Secret Illegal Police Stations in America; FBI raid, 2 people arrested

    अमेरिकेत चीनचे छुप्या पद्धतीने बेकायदा पोलीस ठाणे; एफबीआयची धडक कारवाई, 2 जणांना अटक

    वृत्तसंस्था

    वॉशिंग्टन : चीन सरकारसाठी बेकायदेशीरपणे पोलिस स्टेशन चालवल्याच्या आरोपावरून अमेरिकेने सोमवारी (17 एप्रिल) दोन चिनी नागरिकांना अटक केली आहे. चीनच्या सार्वजनिक सुरक्षा मंत्रालयात (एमपीएस) काम केल्याच्या आरोपावरून एफबीआयने चेन जिनपिंग (59) आणि लू जियान वांग (61) यांना मॅनहॅटन परिसरातून अटक केली.China’s Secret Illegal Police Stations in America; FBI raid, 2 people arrested

    अमेरिकेच्या न्याय विभागाने जारी केलेल्या निवेदनानुसार हे दोघेही अमेरिकन सरकारला न कळवता चीन सरकारसाठी काम करत होते. दोन्ही चिनी नागरिक सार्वजनिक सुरक्षा मंत्रालयाच्या (एमपीएस) आदेशानुसार काम करत होते. हे दोघेही अमेरिकेतील चिनी सरकारवर टीका करणार्‍या चिनी नागरिकांना आणि स्थलांतरितांना धमक्या देत असत.


    भारतीय औषध कंपनीच्या आय ड्रॉपवरून अमेरिकेत वादंग, तिघांचा मृत्यू; 8 जणांची गेली दृष्टी


    अमेरिकेत एक मोठे नेक्सस कार्यरत – FBI

    एफबीआयने गेल्या वर्षी सुरू केलेल्या तपासात अमेरिकेत एक मोठे नेक्स कार्यरत असल्याचे आढळून आले. हे लोक अशा लोकांना धमक्या देत असत जे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर चिनी सरकारवर टीका करत असत.

    यानंतर अमेरिकेच्या भूमीवर चालणारी अशी पोलीस ठाणी बंद करण्यात आली. पण चेन आणि लू गुप्तपणे चीन सरकारच्या एमपीएसचे पोलीस कर्मचारी म्हणून काम करत होते. एफबीआयने अशा प्रकरणातील पीडितांसाठी एक विशेष वेबसाइटही जारी केली आहे.

    इतर देशांत चिनी पोलिस स्टेशन

    चीन अमेरिकेव्यतिरिक्त, कॅनडा, आयर्लंड आणि नेदरलँड यासारख्या इतर देशांमध्ये डझनभर बेकायदेशीर पोलीस चौक्या कार्यरत आहेत. गेल्या वर्षी कॅनडातून अशीच एक घटना पाहिली गेली होती, जिथे बेकायदेशीर चिनी पोलीस चौक्या सुरू होत्या.

    हे लोक परदेशात चिनी हितसंबंध वाढवण्यासाठी काम करतात. त्याच वेळी, यूएस ऍटर्नी ब्रायन पीस यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, एक गुप्त पोलिस स्टेशन स्थापन करून, चीन सरकारने आपल्या देशाच्या सार्वभौमत्वाचे घोर उल्लंघन करण्याचा प्रयत्न केला आहे.

    China’s Secret Illegal Police Stations in America; FBI raid, 2 people arrested

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या

    Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प इटलीच्या PM मेलोनींना भेटले; युरोपियन युनियनशी व्यापार कराराचे आश्वासन