विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : जगभर कोरोनाचे संकट निर्माण करून जगाला मरणाच्या दारात नेऊन ठेवणाऱ्या चीनने जगावर आणखी एक संकट निर्माण करून ठेवले आहे. चीनचे एक मोठं अनियंत्रित रॉकेट The Long March 5B हे या आठवड्यात कोणत्याही क्षणी पृथ्वीवर आदळण्याची शक्यता आहे. ते कोठे आदळणार याचे नेमके ठिकाण निश्चित नसल्यामुळे ते जगाची डोकेदुखी बनले आहे. China’s Long March Rocket Will Fall any Time on Earth. India May be also in Trouble.
रॉकेट The Long March 5B ने जगभरात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. यापूर्वी 1979 मध्ये अमेरिकेचे स्कायलॅबने (अवकाश स्थानक) असाच जगाला ताप दिला होता. हे स्पेस स्टेशन पृथ्वीवर आदळलं तर संपूर्ण मानवजातीचा नाश होऊ शकतो, अशा अफवा पसरल्या होत्या. अखेर ते भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान हिंद महासागरात कोसळले होते.
ऑस्ट्रेलियात त्याचे तुकडे पडले. पण, जिवित हानी झाली नाही. त्याच धर्तीवर The Long March 5B सुद्धा हिंद महासागर किंवा भारतावर कोसळले तर धोका निर्माण होऊ शकतो. ते पृथ्वीच्या कक्षेत येताना नष्ट झाले तर उत्तमच आहे.
भारताची तयारी कुठपर्यंत ?
चीनचे हे अनियंत्रित रॉकेट पृथ्वीवर आदळणार आहे. ते हिंद महासागरात कोसळले किंवा भारतावर कोसळले तर काय करणार ? ते भारतावर कोसळण्यापूर्वी ते नष्ट करण्यासाठी काय उपययोजना केल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापनासाठी कोणते उपाय केले, याचा विचार करण्याची वेळ आली आहे.
रॉकेट दृष्टीक्षेपात
नाव : The Long March 5B
लांबी : 30 मीटर
वजन : 20 हजार किलो
कशासाठी निर्मिती : चीनचे अवकाश स्थानक Tiangong-3 च्या माध्यभागाच्या सांगाड्याच्या वाहतुकीसाठी वापर
उड्डाण केव्हा केले : 29 एप्रिल 2021 रोजी हैनांन प्रांतातील वेनचँग अवकाश केंद्रावरून प्रक्षेपण
काय झाले : हे रॉकेट अनियंत्रित झाले आहे. त्यामुळे ते या आठवड्यात केव्हाही आणि कोठेही कोसळण्याचा धोका आहे.
China’s Long March Rocket Will Fall any Time on Earth. India May be also in Trouble.
महत्वाच्या बातम्या
- कर्नाटकात कडक लॉकडाऊनची घोषणा , 10 ते 24 मे पर्यंत लागू ; जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीस सकाळी चार तास परवानगी
- पुणे जिल्ह्यातील 27 गावांमध्ये टँकरने पाणी, नळाने पुरवठा केव्हा ? महिलांच्या डोक्यावरील हांडे उतरणार केव्हा ?
- दिल्लीकरांसाठी ‘मिल्क ट्रेन’ धावली ; नागपूरहून 40 हजार लिटर रवाना
- शहामृगासारखे संकट आल्यावर वाळूत तोंड खूपसून बसलात, उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना फटकारले
- मुले बाधित झाली तर पालकांनी काय करावे? लहानग्यांच्या लसीकरणावर विचार करा