• Download App
    चीनची लोकशाही समर्थकांवर दडपशाही, हॉँगकॉँमध्ये दोन पत्रकारांवर देशद्रोहाच्या आरोपाखाली गुन्हा|China's crackdown on pro-democracy activists, two Hong Kong journalists charged with treason

    चीनची लोकशाही समर्थकांवर दडपशाही, हॉँगकॉँमध्ये दोन पत्रकारांवर देशद्रोहाच्या आरोपाखाली गुन्हा

    विशेष प्रतिनिधी

    हाँगकाँग : हाँगकाँगमध्ये लोकशाही समर्थकांवर चीनकडून दडपशाहीची कारवाई केली जातेय. हाँगकाँग पोलिसांनी गुरुवारी एका लोकशाही समर्थक न्यूज वेबसाईटशी निगडित दोन जणांवर देशद्रोहाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.China’s crackdown on pro-democracy activists, two Hong Kong journalists charged with treason

    ‘स्टँड न्यूज’ या वेबसाइटनं एक आदल्या दिवशी पोलिसांकडून कार्यालयावर छापे टाकल्याचं सांगितलं होतं. या छापेमारीनंतर सात जणांना अटक करण्यात आली असून यापुढे आपल्या वेबसाईटवर आणि सोशल मीडिया खात्यांवर कोणत्याही प्रकारे नवीन सामग्री अपलोड करता येणार नाही,



    ही वेबसाईट बंद केली जात असल्याचं तसंच आपल्यावर दडपशाहीचा प्रयत्न केला जात असल्याचे म्हटले होते. अटक करण्यात आलेल्यांत स्टँड न्यूजचा एक माजी संपादक तसंच एका विद्यमान संपादक चुंग पुई-कुएन आणि पॅट्रीक लॅम यांचाही समावेश होता. यामध्ये चार महिलांचाही समावेश होता.

    याशिवाय गायक डेनिस हो आणि माजी खासदार मागार्रेट न्गो यांनाही बुधवारी अटक करण्यात आली. सोबतच संस्थेशी निगडीत वस्तू आणि संपत्तीही जप्त करण्यात आली. संस्थेशी निगडीत लोकांच्या घरांवरही छापेमारी करण्यात आली.

    ३३ वर्षीय आणि ५२ वर्षीय अशा दोन पुरुषांवर देशद्रोही सामग्री प्रकाशित करण्याचा कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय सुरक्षा पोलिसांनी एका पत्रकाद्वारे दिलीय. या दोन्ही आरोपींची ओळख अद्याप उघड करण्यात आलेली नाही. मात्र, स्थानिक मीडियानं दिलेल्या माहितीनुसार, स्टँड न्यूजचे संपादक चुंग पुई-कुएन आणि पॅट्रीक लॅम या दोघांविरुद्ध ही कारवाई करण्यात आलीय.

    ‘अ‍ॅपल डेली’ या लोकशाही समर्थक वृत्तपत्राचे माजी संपादक चॅन पुई-मॅन आणि चुंग यांच्या पत्नीलाही अटक करण्यात आली आहे. न्यूज पोर्टलनं दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या सर्व कर्मचाºयांना कामावरून कमी करण्यात आलंय. ‘अ‍ॅपल डेली’ बंद झाल्यानंतर हाँगकाँगमध्ये थेट विरोध आणि टीका करणारा शेवटच्या मीडिया संस्थेपैंकी एक असलेल्या ‘स्टँड न्यूज’च्या कार्यालयावरही बुधवारी कारवाई करण्यात आली.

    China’s crackdown on pro-democracy activists, two Hong Kong journalists charged with treason

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या