• Download App
    चीनने कधीही दडपशाही सहन केली नाही आणि करणारही नाही – जिनपिंग यांचा इशारा|China warns whole world

    चीनने कधीही दडपशाही सहन केली नाही आणि करणारही नाही – जिनपिंग यांचा इशारा

    विशेष प्रतिनिधी

    बीजिंग : आम्ही याआधीही कधीही दडपशाही सहन केली नव्हती, यापुढेही करणार नाही. जो कोणी असा प्रयत्न करेल, ते दीड अब्ज चिनी नागरिकांच्या पोलादी भिंतीवर आदळतील.’ असा खणखणीत इशारा चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी अवघ्या जगाला दिला आहे.China warns whole world

    चीनमधील सर्वशक्तीमान कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना (सीपीसी) या पक्षाच्या स्थापनेला शंभर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त बीजिंगमधील प्रसिद्ध तिआनमेन चौकात आयोजित जल्लोषी कार्यक्रमात त्यांनी चीनच्या वाटचालीची दिशा स्पष्ट केली.



    या रंगारंग सोहळ्यात तिन्ही सैन्य दलांचे संचलनही झाले तसेच ७१ लढाऊ विमानांची प्रात्यक्षिके झाली. जवळपास ७० हजार पक्ष कार्यकर्ते आणि विद्यार्थी तसेच पक्षाचे अनेक माजी वरीष्ठ नेते उपस्थित होते.
    तिआनमेन गेटच्या बाल्कनीतून भाषण करताना जिनपिंग यांनी चीनच्या सामर्थ्याचे कौतुक करतानाच इतर देशांना इशारा दिला.

    ते म्हणाले, तैवानला सामावून घेण्याच्या चीनच्या दुर्दम्य इच्छेला कोणीही कमी समजू नये, असा इशाराही जिनपिंग यांनी दिला. ‘तैवानचे विलीनीकरण ही एक ऐतिहासीक मोहिम आहे. ही मोहिम पूर्ण करण्यात येते

    China warns whole world

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Microsoft : मायक्रोसॉफ्ट भारतात ₹1.6 लाख कोटींची गुंतवणूक करणार; AI आणि क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च होणार

    Actor Dileep : मल्याळम अभिनेता दिलीपची रेप केसमधून मुक्तता; केरळ न्यायालयाने 6 जणांना दोषी ठरवले; 2017 मध्ये चालत्या कारमध्ये गँगरेप

    UK PM Starmer : ब्रिटिश पीएम स्टार्मर म्हणाले- युक्रेनचे निर्णय तेच घेतील; झेलेन्स्कींना म्हणाले- आम्ही तुमच्यासोबत आहोत; लंडनमध्ये युरोपीय नेत्यांची गुप्त बैठक