वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारतातल्या लिबरल्सना वेगवेगळ्या पद्धतीने फूस लावून स्त्री-पुरुष समानतेचा अतिरिक्त डोस पाजणाऱ्या चीनने स्वतःच्या देशातील महिलांना मात्र घरी बसावे, मुले जन्माला घालावीत आणि कुटुंब सांभाळावे, आहे असा नवा उपदेश केला आहे. हा उपदेश दुसऱ्या तिसऱ्या कोणी दिला नसून चीनचे खऱ्या अर्थाने सर्वेसर्वा राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी केला आहे. China wants women to stay home and bear children
या संदेशात शी जिनपिंग यांनी अतिशय गोड आणि मखमली भाषा वापरली आहे. कौटुंबिक सद्भाव, सामाजिक सद्भाव आणि राष्ट्रीय विकास यांचा समन्वय साधण्यासाठी चिनी महिलांनी योगदान करावे. त्यासाठीच त्यांनी विवाह, वैवाहिक जीवन आणि मुले जन्माला घालण्याची नवी संस्कृती विकसित करावी, असे आवाहन शी जिनपिंग यांनी चिनी महिलांना केले आहे. या मखमली भाषेमागचा मूळ संदेश चिनी महिलांनी घरी बसावे, मुले जन्माला घालावीत आणि कुटुंब सांभाळावे हाच आहे.
दर 5 वर्षांनी चिनी कम्युनिस्ट पार्टी महिला शाखेचे एक अधिवेशन चिनी काँग्रेसमध्ये भरवते. त्याला जगात ऑल चायना वुमेन फेडरेशन असे संबोधले जाते. या अधिवेशनातच शी जिनपिंग यांनी वर उल्लेख केलेला चिनी महिलांनी घरी बसावे, मुले जन्माला घालावीत आणि कुटुंब सांभाळावे, हा संदेश दिला आहे.
कम्युनिस्टांमध्ये स्त्री-पुरुष समानतेला विशेष महत्त्व आहे. आता जगात फक्त चीन हा एकमेव कम्युनिस्ट देश उरल्यामुळे त्या देशात तरी स्त्री-पुरुष समानता असेल असे भासवले जाते. पण प्रत्यक्षात चीनमध्ये गेल्या कित्येक वर्षांच्या कम्युनिस्ट लोकसंख्या धोरणामुळे चीनची तरुणांची संख्या घटली आणि वृद्धांची संख्या वाढली. जगाची मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरी बनलेल्या चीनमध्ये तरुण कामगारांची कमतरता भासू लागली. कम्युनिस्ट पार्टीच्या कौटुंबिक धोरणामुळे चीन मधली कुटुंब व्यवस्थाच पूर्ण धोक्यात आली. चीनचे कौटुंबिक संतुलन ढासळले आणि त्या पाठोपाठ लोकसंख्यात्मक संतुलन देखील संपुष्टात आले. त्यामुळे चीनमध्ये आता वृद्धांची संख्या वाढून तरुणांची संख्या घटत आहे.
या पार्श्वभूमीवर चीनला तरुणांची संख्या वाढविण्याचा विशेष प्रयत्न करावा लागत आहे या प्रयत्नाचा एक भाग म्हणून राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी चिनी महिलांना घरी बसून मुले जन्माला घालावीत आणि कुटुंब सांभाळावे हा संदेश दिला आहे.
हा तोच चीन आहे, जो भारतात मात्र लिबरल्सना वेगवेगळ्या पद्धतीची चिथावणी देऊन भारतात अतिरिक्त समतेचा डोस पाजत राहतो. भारतीय संस्कृतीचा मूळ गाभा असलेली कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त करण्यासाठी भारतीय कम्युनिस्टांना फंडिंग करतो, पण प्रत्यक्षात चीनमध्ये मात्र चिनी महिलांना घरी बसून मुले पैदा करण्याचा आणि कुटुंब सांभाळण्याचा उद्देश करतो, ही विसंगती राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या वक्तव्यातून समोर आली आहे.
China wants women to stay home and bear children
महत्वाच्या बातम्या
- बिहारमध्ये यदुवंशियांबाबत भाजप-आरजेडीमध्ये वादंग!
- म्यानमारमध्ये लष्कराने पुन्हा हवाई हल्ला केला, 5 हजार लोक मिझोरामला पळून आले; 2021च्या सत्तापालटापासून 30 हजार लोकांनी आश्रय घेतला
- बारामतीच्या दिवाळीचे कौतुक पुरे झाले, आता धनगर आरक्षणासाठी उद्या बारामती बंदची हाक
- अमिताभ बच्चन दिवाळखोर झाल्यावर सुब्रत रॉय यांनी दिला होता ‘सहारा’