विशेष प्रतिनिधी
बीजिंग – मुलांमध्ये ऑनलाइन गेम खेळण्याचे प्रमाण प्रचंड वाढल्याने सरकारने कडक पावले उचलली आहेत. अल्पवयीन मुलांच्या ऑनलाइन गेम खेळण्यावर चीन सरकारने निर्बंध आणले आहेत. China restricts mobile game play for children
नवीन नियमानुसार, १८ वर्षांच्या आतील मुलांना दिवसातून केवळ एक तास व्हिडिओ गेम खेळण्यास परवानगी देण्यात आली आहे.
ऑनलाइन गेम हे एक व्यसन असल्याचे काही दिवसांपूर्वी चीनच्या सरकारी माध्यमांनी म्हटले होते. अनेक लहान मुलांचा दिवसातील बराच काळ ऑनलाइन गेम खेळण्यातच वाया जात असल्याचे लक्षात आल्याचे सरकारने म्हटले आहे.
त्यामुळे यावर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकारने गेम खेळण्यासाठीच्या वेळा ठरवून दिल्या आहेत. त्यानुसार, १८ वर्षांखालील मुलांना शुक्रवार, शनिवार आणि रविवारसह सुटीच्या दिवशी रात्री आठ ते नऊ या वेळेतच गेम खेळण्यास परवानगी देण्यात आली आहे. या वेळे व्यतिरिक्त या मुलांना गेम खेळण्यास मनाई करावी, अशा सूचना गेमिंग कंपन्यांनीही देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात या कंपन्यांवरही सरकारची देखरेख वाढणार आहे.
China restricts mobile game play for children
महत्त्वाच्या बातम्या
- जेईई मेन परीक्षेत घोटाळा करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, सीबीआयचे दिल्ली,पुणे, बेंगळुरू, जमशेदपूर आणि इंदूरसह एकूण १९ ठिकाणी छापे
- सुब्रमण्यम यांचे पीएम मोदींना पत्र, हायप्रोफाईल भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमधील विलंबामुळे भाजपची प्रतिमा मलिन होत आहे
- कोरोना हाताळण्यात अपयश, जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा देणार राजीनामा