• Download App
    अमेरिकेच्या आगामी लोकशाही परिषदेला चीनचा कडाडून विरोध|China objects US democracy summit

    अमेरिकेच्या आगामी लोकशाही परिषदेला चीनचा कडाडून विरोध

    विशेष प्रतिनिधी

    बीजिंग – अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांची आगामी लोकशाही परिषद चीन व अमेरिकेमध्ये वादाचे कारण ठरत असून चीनच्या हुकूमशाही व्यवस्थेला हे आव्हान असल्याचे चीनला वाटत आहे.China objects US democracy summit

    चीनमधील सध्याचे लोकशाहीचे स्वरूप कायम ठेवण्याचा सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाचा मानस असून ‘चायना ः डेमोक्रसी दॅट वर्क्स’ या शीर्षकाचा अहवाल शनिवारी प्रसिद्ध करण्याचे नियोजन सरकारने आखले आहे. लोकशाही परिषदेचे उद्घारटन बायडेन यांच्या हस्ते गुरुवारी होणार आहे.



    त्यापूर्वी हा अहवाल प्रकाशित करण्याचा चीनचा प्रयत्न आहे. बायडेन यांच्या लोकशाही परिषदेने देशांमध्ये फूट पडण्याचची शक्यता चीनी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.या परिषदेत एकमेकांची उणीदुणी काढली जातील, असा दावाही त्यांनी केला आहे. चीनचे हे आरोप अमेरिकेने फेटाळून लावले आहेत.

    जगात लोकशाही कास पकडण्यासाठी एकत्र काम करण्यावर परिषदेत चर्चा होणार आहे, असा खुलासा व्हाइट हाउसच्या जनसंपर्क सचिव जेन पास्की यांनी केला आहे. व्हर्च्युहअल पद्धतीने होणाऱ्यान दोन दिवसांच्या परिषदेत ११० देश सहभागी होणार आहेत.

    China objects US democracy summit

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Pakistan air strike : पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ला; 11 मुलांसह 13 जणांचा मृत्यू, तालिबान संतप्त

    Pakistan-China : अमेरिकेने UNSC मध्ये पाकिस्तान-चीनचा प्रस्ताव रोखला, बलुचिस्तान लिबरेशन आर्मी आणि मजीद ब्रिगेडला दहशतवादी संघटना घोषित करण्याची मागणी होती

    Philippines : फिलिपिन्समध्ये 7.8 तीव्रतेच्या भूकंपानंतरही धडकी भरवणारी स्थिती; 2,100 हून अधिक आफ्टरशॉक्स, मृतांचा आकडा 45 वर