• Download App
    इम्रान सरकार चीनच्या मुठीत, पीओकेमध्ये वाढतंय ड्रॅगनचे वर्चस्व; 2025 पर्यंत पाकिस्तानात चिनी कामगारांची संख्या 50 लाखांवर जाणार । China Growing Its Dominance In Pakistan, Around 50 Lakh Chinese To Work In Pakistan By 2025

    इम्रान सरकार चीनच्या मुठीत, पीओकेमध्ये वाढतंय ड्रॅगनचे वर्चस्व; 2025 पर्यंत पाकिस्तानात चिनी कामगारांची संख्या 50 लाखांवर जाणार

    China Growing Its Dominance In Pakistan : पाकिस्तानमध्ये चीन आपली प्रस्थ सातत्याने वाढवत आहे. प्रथम चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (सीपीईसी) च्या बांधकामाद्वारे आणि आता पाकिस्तानमध्ये आरोग्य सेवा बळकट करण्याच्या बहाण्याने चीन या देशात सतत आपले पाय पसरत आहे. China Growing Its Dominance In Pakistan, Around 50 Lakh Chinese To Work In Pakistan By 2025


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये चीन आपली प्रस्थ सातत्याने वाढवत आहे. प्रथम चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (सीपीईसी) च्या बांधकामाद्वारे आणि आता पाकिस्तानमध्ये आरोग्य सेवा बळकट करण्याच्या बहाण्याने चीन या देशात सतत आपले पाय पसरत आहे.

    4 वर्षांत 50 लाख चिनी नागरिक पाकिस्तानात

    चीन आपल्या 50 लाख नागरिकांना पुढील 4 वर्षांत (2025 पर्यंत) बांधकाम आणि आरोग्य सेवांसाठी पाठवणार असल्याचे उघड झाले आहे. पाकिस्तानातील एका ज्येष्ठ आरोग्य तज्ज्ञाने एका मुलाखतीदरम्यान हा खुलासा केला. पाकिस्तानच्या आरोग्य सेवा अकादमीचे प्राध्यापक डॉ. शहजाद अली खान यांनी एका मुलाखतीदरम्यान 50 लाख चिनी कामगारांच्या येणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले की, चीनमधून येणाऱ्या कामगारांच्या आरोग्यविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी ‘चीन-पाकिस्तान हेल्थ कॉरिडॉर’ (सीपीएचसी) अंतर्गत दोन्ही देशांतील वैद्यकीय विद्यापीठे आणि संशोधन संस्था यांच्यातील सहकार्य वाढेल.

    डॉ. शहजाद म्हणाले, “आम्हाला आधुनिक वैद्यकीय तंत्र आणि पारंपरिक चिनी औषधांतील पाकिस्तानी तज्ज्ञांना बळकट करायचे आहे. हे तज्ज्ञ केवळ भेट देणाऱ्या चिनी नागरिकांच्या गरजा पूर्ण करणार नाहीत, तर पर्यायी औषधावर अवलंबून असलेल्या पाकिस्तान्यांनाही मदत करतील.”

    पाक सरकारला ड्रॅगनचा विळखा

    दुसरीकडे, तज्ज्ञांच्या मते, चीन अशा प्रकल्पांद्वारे पाकिस्तान सरकारवर आपली पकड मजबूत करत आहे. विशेष म्हणजे चीन पाकिस्तानमध्ये आधीच अनेक ट्रिलियन डॉलरचे प्रकल्प सुरू आहे. सीपीईसीचा एक भाग पाकव्याप्त काश्मीर आणि बलुचिस्तानमधूनही जातो, ज्यावर भारताने सातत्याने आक्षेप घेतला आहे.

    एवढेच नाही, तर बलुचिस्तानच्या बंडखोर संघटनांनी चिनी अभियंत्यांच्या ताफ्यावरही हल्ला केला आहे. या वर्षी एप्रिलमध्ये बलुचिस्तानमधील एका मोठ्या हॉटेलमध्ये कार बॉम्बस्फोट झाला. त्या वेळी चीनचे राजदूतही हॉटेलमध्ये थांबले होते. तसेच जुलैमध्ये, एका जलविद्युत धरणावर काम करण्यासाठी बसने प्रवास करणाऱ्या चिनी नागरिकांचा स्फोटात मृत्यू झाला होता. यासाठी बलोच फुटीरतावाद्यांना जबाबदार ठरवण्यात आले होते.

    China Growing Its Dominance In Pakistan, Around 50 Lakh Chinese To Work In Pakistan By 2025

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र