विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – चीनने लडाखमध्ये मोठ्या प्रमाणावर फौजफाटा तैनात केला असून ही आपल्यासाठी चिंतेची बाब असल्याचे लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी म्हटले आहे. China deployed army in Ladhakh
चीनने पूर्व आणि उत्तर लडाखमध्ये मोठ्या प्रमाणावर फौजफाटा तैनात केला आहे. येथील चिनी सैनिकांच्या संख्येमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने ही आपल्यासाठी चिंतेची बाब असल्याचे नरवणे यांनी एएनआयशी बोलताना सांगितले.
पूर्व लडाखमधील तयारीचा आढावा घेण्यासाठी जनरल नरवणे दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी रेझांग ला युद्ध स्मारकाला भेट देऊन हुतात्म्यांना अभिवादन केले. भारताने खबरदारीचा उपाय म्हणून लडाख सीमेवर ‘के-९ वज्र हॉवित्झर’ तोफा तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.
या माध्यमातून ५० किलोमीटरपर्यंतच्या लक्ष्याचा थेट वेध घेता येऊ शकतो. लडाखमध्ये भारताने ‘टी-९०’ रणगाडेही तैनात केले आहेत. याबाबत बोलताना लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे म्हणाले की, उंचावरील ठिकाणावर देखील या तोफा तैनात केल्या जाऊ शकतात. या तोफांच्या चाचण्या याआधीही प्रचंड यशस्वी झालेल्या आहेत.
China deployed army in Ladhakh
महत्त्वाच्या बातम्या
- सशक्त, आत्मनिर्भर भारतासाठी शपथ घ्या, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आवाहन
- लालूप्रसादांच्या घरात उफाळून आली भाऊबंदकी, तेजस्वीने लालूंना दिल्लीत कोंडून ठेवल्याचा धाकटा भाऊ तेजप्रतापचा आरोप
- रामदास कदम खोटारडे, शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवींची टीका
- जलयुक्त शिवारमुळे नव्हे, तर नद्यांमधील अवैध वाळू उपशामुळे पूर; फडणवीसांचा ठाकरे – पवार सरकारला टोला