China : चीनने दावा केलाय की तिबेटमधील भारत, भूतान आणि नेपाळच्या सीमेवरील दुर्गम खेड्यांमध्ये पायाभूत सुविधा विकसित करत आहे. शुक्रवारी चीन सरकारने जाहीर केलेल्या तिबेटवरील श्वेत पत्रातून ही माहिती देण्यात आली आहे. ‘तिबेट 1951 पासून मुक्ति, विकास आणि समृद्धी’ या शीर्षकाच्या दस्तऐवजात असे म्हटले आहे की, हिमालयीन प्रदेशात 4000 किमी लांबीची बाह्य सीमा असल्याने सीमावर्ती भागांचा विकास करणे आणि तिबेटियन लोकांच्या जीवनात सुधारणा आणणे महत्त्वाचे झाले आहे. China Claimed Developing Border Villages Near Arunachal Pradesh Nepal And Bhutan
विशेष प्रतिनिधी
बीजिंग : चीनने दावा केलाय की तिबेटमधील भारत, भूतान आणि नेपाळच्या सीमेवरील दुर्गम खेड्यांमध्ये पायाभूत सुविधा विकसित करत आहे. शुक्रवारी चीन सरकारने जाहीर केलेल्या तिबेटवरील श्वेत पत्रातून ही माहिती देण्यात आली आहे. ‘तिबेट 1951 पासून मुक्ति, विकास आणि समृद्धी’ या शीर्षकाच्या दस्तऐवजात असे म्हटले आहे की, हिमालयीन प्रदेशात 4000 किमी लांबीची बाह्य सीमा असल्याने सीमावर्ती भागांचा विकास करणे आणि तिबेटियन लोकांच्या जीवनात सुधारणा आणणे महत्त्वाचे झाले आहे.
दस्तऐवजानुसार, सीमेजवळचे रहिवासी कठीण जीवन जगतात आणि कठीण परिस्थितीत काम करतात. तेथे गरिबीही जास्त आहे. सरकार सर्व पातळ्यांवर सीमाभागाचा विकास करून लोकांचे जीवनमान सुधारण्याचा प्रयत्न करत आहे.
यानुसार, कम्युनिस्ट पक्षाच्या मार्गदर्शनाखाली तिबेटमधील सीमा विकासासाठी वर्षानुवर्षे आर्थिक तरतूद वाढविण्यात आली आहे. २०१२ मध्ये राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग सत्तेत आल्यापासून सुरक्षिततेवर अधिक भर देऊन नवीन गावे स्थापन केल्याने चीनच्या सीमावर्ती क्षेत्राच्या विकासाला प्राधान्य देण्यात आले आहे.
भारत-चीन सीमा विवादात 3488 किमी लांबीची वास्तविक नियंत्रण रेखा (एलएसी) आहे. अरुणाचल प्रदेशवर चीन हा दक्षिण तिबेटचा भाग असल्याचा दावा करत आला आहे, पण भारताने त्यांचा दावा ठामपणे नाकारला आहे. चीनची भूतानसह 477 किमी लांबीची सीमा असून नेपाळला 1313 किलोमीटरची सीमा आहे.
राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी 2017 मध्ये अरुणाचल प्रदेशजवळील लुंजे काउंटी येथील तिबेटी कुटुंबाला लिहिलेल्या पत्रामध्ये सीमाभागातील गावांच्या विकासाची रूपरेषादेखील दर्शविली होती आणि चिनी प्रदेशाच्या संरक्षणासाठी त्यांचे मूळ स्थापित करण्यासाठी आणि त्यांचे गाव वाढवण्यास सांगितले होते.
China Claimed Developing Border Villages Near Arunachal Pradesh Nepal And Bhutan
महत्त्वाच्या बातम्या
- ब्रिटनच्या तरुण पिढीला राजेशाही संपुष्टात आणण्याची इच्छा, सर्वेक्षणातून स्पष्ट कल
- पाकिस्तानात पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ निघालेल्या रॅलीदरम्यान स्फोट, ७ जण ठार; १३ जखमी
- जगभरात कोरोना मृत्यूंची संख्या प्रत्यक्षात दुप्पट असल्याची WHO ची भीती; १८ नव्हे, ३० लाख रुग्णांच्या मृत्यूची शक्यता
- लडाखमध्ये 24 तासांत दुसऱ्यांदा भूकंप, रिश्टर स्केलवर 3.6 तीव्रतेची नोंद
- Nepal Mid-Term Polls : नेपाळच्या राष्ट्रपतींनी संसद भंग केली, मध्यावधी निवडणुकीसाठी नवीन तारीख जाहीर